मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /हाच खरा 'हिरो'! कोरोना रुग्णांसाठी डॉक्टरचा अक्षय-हृतिकच्या गाण्यांवर ब्रेक डान्स

हाच खरा 'हिरो'! कोरोना रुग्णांसाठी डॉक्टरचा अक्षय-हृतिकच्या गाण्यांवर ब्रेक डान्स

आसाममधील डॉक्टरनं रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल; बॉलिवूड गाण्यांवर करतोय धम्माल डान्स

आसाममधील डॉक्टरनं रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल; बॉलिवूड गाण्यांवर करतोय धम्माल डान्स

आसाममधील डॉक्टरनं रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल; बॉलिवूड गाण्यांवर करतोय धम्माल डान्स

मुंबई 28 मे: कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. (coronavirus in india) देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु झालंय. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. (coronavirus vaccine) परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमालीचा वाढला आहे. डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचारी दिवस-रात्र एक करुन रुग्णांना बरं करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान या प्रतिकूल परिस्थितीत नैराश्येत जाणाऱ्या रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी एक डॉक्टर उपचारांसोबतच रुग्णांचं मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूड गाण्यांवर डान्स करतोय. या डान्सचे व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहेत.

या डॉक्टरचं नाव अरुण सेनापती असं आहे. (Dr Arup Senapati ) आसामधील गोलपारा जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णालयात हा डॉक्टर रुग्णांचे उपचार करतोय. पण सोबतच तो डान्स देखील करतो. नुकतेच त्यानं अक्षय कुमारच्या फलक तक चल साथ मेरे या गाण्यावर धम्माल ब्रेक डान्स केला. टशन चित्रपटातील हे गाणं 2008 साली उदित नारायण आणि महालक्ष्मी यांनी गायलं होतं. सध्या हे गाणं डॉक्टर अरुणमुळं चर्चेत आहे. यापूर्वी देखील त्यानं हृतिक रोशनच्या अंदाजात बजे घुंबरु या गाण्यावर डान्स केला होता.

‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

" isDesktop="true" id="557354" >

कोरोनामुळं अनेक रुग्ण नैराश्येत गेले आहेत. त्यांना उपचारासोबतच सकारात्मक उर्जेची गरज आहे. यासाठी त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी वळवावं लागेल म्हणून हा डॉक्टर दररोज विविध गाण्यांवर डान्स करुन आपल्या रुग्णांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल. सोशल मीडियावर या डॉक्टरचं तोंड भरुन कौतुक केलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Corona hotspot, Coronavirus cases