दिवाळीनमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूकमधले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना अनेक सुंदर कॉमेंट्स येत आहेत.
अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांना नव्या प्रोजेक्ट्सबद्दल सोशल मीडियावरुन माहिती देत असते.
पवित्र रिश्ता या मालिकेमुळे अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली होती. त्यानंतर तिच्या आणि सुशांत सिंह राजपूतच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या येत होत्या.
मणिकर्णिका या चित्रपटामधून अंकिताने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. तिच्या वाट्याला आलेली लहानशीच भूमिका तिने उत्तमरित्या निभावली होती.
बाघी 3 सिनेमामध्येही अंकिता लोखंडेने काम केलं आहे. या सिनेमामध्ये तिच्यासोबत टायगर श्रॉफ, रितेश देशमुख, श्रद्धा कपूर असे अनेक बडे स्टार्स होते.