बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी(Disha Patani) जितकी तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते, त्यापेक्षा कितीतरी पटीनं ती टायगर श्रॉफसेबतच्या(Tiger Shroff) अफेअरमुळे चर्चेत असते. दिशा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते. दिशा नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. दिशाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमुळे सोशल मीडियाचे तापमान मात्र वाढले आहे.
दिशा पटानीने (Disha Patani Instagram) सोशल मीडियावर बिकिनीतले काही फोटो शेअर केले आहेत.हे फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये फायर इमोजी पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये तिनं क्रीम रंगाची ट्यूब टायप बिकिनी घातलेली दिसत आहे.(फोटो साभार @dishapatani/instagram)
या फोटोंमध्ये दिशाचा लुक नेहमीप्रमाणे खूप साधा पण तितराच हॉट दिसत आहे. विस्कटलेल्या मोकळ्या केसांध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. आरशासमोर ती विविध पोझ देताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर पडत असलेल्या आरशाच्या किरणांनी तिच्या सौंदर्यात भरच टाकली आहे. (फोटो साभार @dishapatani/instagram)
दिशाच्या बिकिनी लुकवर चाहते कमेंट करत तिच्या लुकचं कौतुक करत आहे. एका तासाच्या आत दिशाच्या या फोटोंना पाच लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. कमेंटचा तर महापूरच आला आहे. तिच्या या फोटोंवर कुणी हार्ट इमोजी कर कुणी फायर तर काहींनी किसचं आयकॉन शेअर केला आहे. (फोटो साभार @dishapatani/instagram)
दिशाने यापूर्वीगी बिकिनीतले फोटो शेअर केले आहे. दिशाने काही दिवसापूर्वी मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो शेअर केले होते.(फोटो साभार @dishapatani/instagram)
दिशा पटानी जितकी तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असत, त्यापेक्षा ती टायगरसोहृबत अफेअरमुळे चर्चेत असते. (फोटो साभार @dishapatani/instagram)
दिशा पटानी (Disha Patani Photo) सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, दिशा शेवटची सलमान खानसोबत 'राधे' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानंतर दिशा आता 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार असून त्यात तिच्यासोबत जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत. याशिवाय ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्नासोबत 'योद्धा' चित्रपटातही दिसणार आहे. (फोटो साभार @dishapatani/instagram)