मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /OMG! दिशा पाटनीने उचललं 80Kg वेट, VIDEO पाहून टायगर श्रॉफचीही बोलती बंद

OMG! दिशा पाटनीने उचललं 80Kg वेट, VIDEO पाहून टायगर श्रॉफचीही बोलती बंद

बॉलिवूड अभिनेत्री   (Bollywood Actress)  दिशा पाटनीसुद्धा  (Disha Patani)  आपला बॉयफ्रेंड टायगर श्रॉफप्रमाणेच   (Tiger Shroff)  एक फिटनेस फ्रीक व्यक्ती आहे. ती बऱ्याचवेळा सोशल मीडियावर  तिच्या वर्कआउट्स आणि जिम्नॅस्टिक्सचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री   (Bollywood Actress)  दिशा पाटनीसुद्धा  (Disha Patani)  आपला बॉयफ्रेंड टायगर श्रॉफप्रमाणेच   (Tiger Shroff)  एक फिटनेस फ्रीक व्यक्ती आहे. ती बऱ्याचवेळा सोशल मीडियावर  तिच्या वर्कआउट्स आणि जिम्नॅस्टिक्सचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या वर्कआउट पोस्टने ती नेहमीच चाहत्यांची मने जिंकत असते. ती चाहत्यांना जिम्नॅस्टिक्स आणि वर्कआउट्ससाठी प्रोत्साहित करते. अभिनेत्रीने तिच्या  इन्स्टाग्रामवर  एक लेटेस्ट व्हिडिओ   (Instagram Video)  शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेत्री दिशा पाटनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ती बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसह बॉलिवूडच्या  मोठमोठ्या फिटनेस फ्रीक कलाकारांना टक्कर देऊ शकते. या व्हायरल व्हिडिओमध्ये ती 80 किलोचं वजन उचलताना आणि 5 सेट मारताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांसह सहकलाकरांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दिशा पाटनीच्या अशा वर्कआउट्स आणि जिम्नॅस्टिक्समुळे तिचे चाहते तिला 'सर्वात सुंदर अभिनेत्री', 'फॅशनिस्टा' आणि 'फिटनेस फ्रीक' असे विविध सुंदर टॅग देतात. हा व्हिडिओ शेअर करताना दिशाने लिहिले आहे, "रॅक पुल 5 रिप्स 80 किलो." दिशा पटानीने शेअर केलेल्या या  व्हिडिओवर इंडस्ट्रीशी संबंधित तिच्या मित्रांनी कमेंट केल्या आहेत.

दिशाच्या या व्हिडीओवर टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने फायर इमोजीसह कमेंटमध्ये लिहिले, "तू आग आहेस." त्याचबरोबर टायगरची आई आयशा श्रॉफ हिने फायर इमोजीसह 'बीस्ट' असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्री आणि डान्सर एली अवरामनेही कमेंटमध्ये 'डॅम डी' असे लिहिले आहे. दिशा पाटनी  सोशल मीडियावर तिच्या फिटनेस रुटीनची झलक दाखवत असल्याची ही पहिलीच वेळ नाही.याआधीही अभिनेत्रीने अनेक हार्ड एक्सरसाईज शेअर करून सर्वांनाच तोंडात बोटे घालायला भाग पाडलं आहे. दिशा पाटनी फारच उत्तम फ्लाईंग किकसुद्धा मारते. अभिनेत्रीची हीच हटके स्टाईल तिच्या चाहत्यांना भावते.

First published:

Tags: Bollywood actress, Disha patani, Entertainment, Instagram post