मुंबई, 3 फेब्रुवारी- दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट निर्माते काशिनाथनी विश्वनाथ यांचे हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात निधन झाल. ते 92 वर्षांचे होते. विश्वनाथ काही काळापासून आजारी होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते वयोमानाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. गुरुवारी मध्यरात्री त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चित्रपट आणि राजकीय सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आ
विश्वनाथ यांनी 1957 मध्ये 'तोडीकोडल्लू' चित्रपटासाठी ऑडिओग्राफर म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्या चित्रपटादरम्यान त्यांच्या कामाची दखल घेतलेल्या दिग्दर्शक अदुर्थी सुब्बाराव यांनी विश्वनाथ यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी दिली. विश्वनाथ यांनी अक्किनेनी यांच्या 'इदारुमित्रुलु', 'चादुवाक्वाना टेट्रिलू', 'मूगामनसुलु' आणि 'डॉक्टर चक्रवर्ती' सारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल आहे.
के. विश्वनाथ यांचं नाव घेताच 'शंकराभरणम',स्वाती मुथम', 'सागरा संगम', हे लोकप्रिय सिनेमे डोळ्यांसमोर येतात. 19 फेब्रुवारी 1930 रोजी मद्रासच्या रायपल्ले याठिकाणी जन्मलेल्या के विश्वनाथ यांनी सुरुवातीला काही व्यावसायिक चित्रपटांचे दिग्दर्शन केल होतं.
के विश्वनाथ कलातपस्वी या नावानेदेखील ओळखले जात होते. कला तपस्वीला प्रसिद्धी मिळवून देणारा चित्रपट म्हणजे शोभन बाबूचा 'चेलेली कपूरम'. दाक्षिणात्य सिनेमातला एक देखणा नायक म्हणून ओळखले जाणारे शोभन बाबू यांनी या चित्रपटात निरागस भूमिका साकारुन समीक्षकांची प्रचंड प्रशंसा मिळवली होती.
के विश्वनाथ यांना आपल्या कारकिर्दीत प्रचंड पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार तसेच पदमश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, South film