मुंबई, 06 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं ‘पानीपत’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्मानं संजयला त्याच्या 308 गर्लफ्रेंडचं रहस्य विचारलं. यावर संजयनं अजून हा अकडा संपलेला नाही असं उत्तर दिलं होतं. संजयच्या या उत्तरावर सर्वांनाच हसू आलं होतं. पण संजयच्या विधानावरुन बॉलिवूड अभिनेत्री दीपानिता शर्मानं त्याच्यावर निशाणा साधला आहे. यासोबतच जर एखादी महिला या शोमध्ये अशाप्रकारचं विधान करेल तर तो सुद्धा लोकांसाठी विनोदाचा भाग असेल का? असा प्रश्न सुद्धा दीपानीता शर्मानं उपस्थित केला आहे. सध्या दीपानिताचं हे ट्वीट सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
आपल्या ट्वीटमध्ये दीपानितानं ‘द कपिल शर्मा शो’मध्ये संजय दत्तनं त्याच्या गर्लफ्रेंड्स बद्दल दिलेल्या माहितीवर नाराजी व्यक्त केली आहे. तिनं लिहिलं, एका शोमध्ये एक अभिनेता त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी येतो आणि त्याठिकाणी तो त्याच्या 300 पेक्षा जास्त असलेल्या गर्लफ्रेंड्सबद्दल बोलतो. विशेष म्हणजे त्याठिकाणी असलेले होस्ट आणि प्रेक्षक सुद्धा हा विनोद समजून त्यावर हसतात. जर एखाद्या महिलेनं हीच गोष्ट एका शोमध्ये बोलली तर सर्वजण त्याला अशाप्रकारे गंमत म्हणून घेतील का? पूर्वाग्रह नेहमीच चुकीचा असतो आणि हेच सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे.
An actor on a show to promote his next release talks about his score of over 300 girlfriends.The host & audience laughs in good jest.What If a woman said the same thing on a show?Would that be a joke too?This basic gender bias is what has always been wrong.The root of all evil !
— Dipannita Sharma (@Dipannitasharma) December 5, 2019
संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’मध्ये त्याच्या 308 गर्लफ्रेंड असल्याचा उल्लेख केलेला आहे. कपिल शर्मानं त्याच्या शोमध्ये संजयला यासंबंधीत प्रश्न विचारले. याशिवाय त्यानं विचारलं, भाभी (मान्यता दत्त)ला तुझ्या 308 गर्लफ्रेंड बद्दल माहित होतं का? कि तिला सुद्धा सिनेमा रिलीज झाल्यानंतर या सर्व गोष्टी समजल्या. यावर संजय म्हणाला, मी तिनं विचारलं होतं मात्र मी तिला झालेल्या गोष्टी विसरुन जाण्याचा सल्ला दिला होता. संजय दत्तच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं तर पानीपत सिनेमात संजय दत्त अहमद शाह अब्दाली याच्या खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अर्जुन कपूर आणि कृती सेनन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.