सुशांतला हंगेरीत 17 कोटींचं पेमेंट केलंच नाही; 'राबता'च्या दिग्दर्शकाच्या गौप्यस्फोटाने गूढ वाढलं

सुशांतला हंगेरीत 17 कोटींचं पेमेंट केलंच नाही; 'राबता'च्या दिग्दर्शकाच्या गौप्यस्फोटाने गूढ वाढलं

सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) देण्यात आलेल्या 17 कोटींच्या मानधनाबाबत दिग्दर्शक दिनेश विजानने सादर केलेल्या जबाबामुळे खळबळ माजली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या मृत्यू प्रकरणात ईडीच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्याचं कनेक्शन थेट प्रोड्युसर दिनेश विजान (Dinesh Vijan) आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसशी जोडण्यात येत आहे. अशी माहिती मिळाली आहे की, सुशांतला राबता या सिनेमासाठी 17 कोटींची रक्कम देण्यात आली होती. स्वत: विजानने यासंदर्भात स्टेटमेंट दिलं आहे.

दिनेश विजानच्या प्रोडक्शन हाऊसने मांडली भूमिका

दिनेश विजानने आपल्या प्रोडक्शन हाऊसतर्फे अर्थात (Maddock Films) आपली भूमिका मांली आहे. तो म्हणाला, "मी सुशांत पैसे दिले नव्हते. या स्टेटमेंटमध्ये लिहीलं आहे, ‘Maddock Films तर्फे सुशांत सिंह राजपूतला पैसे देण्यात आले नव्हते. आणि लेखामध्ये छापून आल्याप्रमाणे सुशांतने ते 17 कोटी रुपयांचं मानधन हंगरीमध्ये घेतलं नव्हतं’

पुढे असं लिहीलं आहे की, ‘आम्ही सुशांतच्या 'राबता' सिनेमाचं पूर्ण मानधन दिलं होतं. सुशांतला भारतामध्ये मानधन देण्यात आलं होतं. आम्ही ईडीकडे याचे सगळे पुरावे सादर केले आहेत. हंगरीमध्ये होणारं शूटिंग आणि त्याचं मानधान याबाबत सगळे व्यवहार टी सीरिज (T-Series) तर्फे करण्यात आले होते. टी सीरिजच्या लोकांकडून तुम्ही याची खात्री करुन घेऊ शकता.’

‘Maddock Films एक जबाबदार संस्था आहे आणि सर्व नियमांचं पालन करुनच आम्ही काम करतो. इंडिया टूडे नेहमीच सत्य घटना जगासमोर आणतं. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, ते लवकरच खऱ्या घटनांची माहिती देतील. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात आम्ही आमच्याकडे असलेली सर्व माहिती दिली आहे. कृपया आमच्या संस्थेबद्दल अफवा पसरवू नयेत.’

दिनेश विजान काही दिवसांपूर्वीच भारतात येणार होता. पण त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तो सध्या तिथेच राहिला आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 21, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या