गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रकरणामुळे अनेक अवॉर्ड शो रद्द करावे लागले होते. वर्षभराच्या मेहनतीनंतर, ही वेळ आली आहे जेव्हा टीव्ही सेलिब्रिटींना त्यांच्या योगदानासाठी सन्मानित केलं जातं. याशिवाय त्यांचा रेड कार्पेट लूक पाहण्यासारखा असतो.अलीकडेच, टीव्ही सेलेब्स श्रद्धा आर्या, धीरज धूपर, अंजुम फाकीह यांसारखे अनेक सेलिब्रिटी झी रिश्ते अवॉर्ड्स २०२१ च्या रेड कार्पेटवर जबरदस्त लूकमध्ये दिसून आले.
लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री श्रद्धा आर्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिनं लाल रंगाची साडी नेसली होती.
रेड कार्पेटवर 'कुंडली भाग्य' मधील करण लुत्रा अर्थातच अभिनेता धीरज धुपर दिसून आला. यावेळी त्यानं लाल जॅकेट घातला होता.
'कुंडली भाग्य' आणि 'कुमकुम भाग्य'च्या संपूर्ण टीमने रेड कार्पेटवर आपल्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली.
प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे झी रिश्ते अवॉर्ड्समध्ये लोकांना आवडलेल्या व्यक्तिरेखांना अवॉर्ड्स देऊन गौरविण्यात येणार आहे.
'मीत'ची आशी सिंग हिरव्या रंगाच्या साडीत फारच सुंदर दिसत होती. तिने साडीखाली काळ्या रंगाचे शूज घातले होते.
अद्याप झी रिश्ते अवॉर्ड्स कधी होणार हे जाहीर करण्यात आलेलं नाही. लवकरच त्याची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे.