मुंबई, 13 मे- बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या खाजगी आयुष्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. अभिनेते धर्मेंद्र सिनेसृष्टीत येण्यापूर्वीच विवाहित होते. या पहिल्या लग्नानंतर त्यांना 4 मुलेही होती. पण इंडस्ट्रीत वावरताना पुन्हा एकदा त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि ते ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीच्या प्रेमात पडले होते. त्यांनंतर त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट देत हेमाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पत्नीने घटस्फोटाला नकार देताच अभिनेत्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच हेमामालिनीसोबत लग्न केलं होतं.नुकतंच धर्मेंद्र-हेमा च्या लग्नाला 43 वर्षे झाली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, दोन्ही सवत आजपर्यंत एकमेकांना सामोरे गेल्या नाहीत. दोघीही आजपर्यंत एकमेकांच्या घरी आलेल्या नाहीत. पण याबाबतीत हेमाची मुलगी ईशा मात्र अपवाद ठरली. ती थेट जाऊन आपल्या सावत्र आईला भेटली पाहूया काय आहे नेमका किस्सा. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि प्रकाश कौर या दोघी सवत आहेत.धर्मेंद्र यांच्या आयुष्यात हेमाच्या एन्ट्रीने प्रकाश कौर यांचा संसार उध्वस्त व्हायच्या मार्गावर पोहोचला होता. त्यामुळे या दोघींमध्ये नक्कीच मतभेदअसणार असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे या दोघांनी हे उघडपणे कधीच जाहीर केलं नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लग्नाच्या 43 वर्षानंतरही हेमा यांनी आजपर्यंत धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या घरात पाऊलही ठेवलेलं नाहीय. पण त्यांच्या मुलीने ही परंपरा मोडून आपल्या सावत्र आईची भेट घेतली होती. (हे वाचा: सनी देओलचा होता वडील धर्मेंद्रच्या दुसऱ्या लग्नाला विरोध, करणार होता सावत्र आई हेमाला मारहाण? आईने सांगितलं सत्य ) धर्मेंद्र आणि हेमा यांचा विवाह 1980 मध्ये झाला होता. या दोघांच्या लग्नाला 43 वर्षे झाली आहे. मात्र धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी आजपर्यंत समोरासमोर आल्या नाहीत. धर्मेंद्र नेहमीच आपल्या दोन्ही कुटुंबांसाठी सदैव उपस्थित राहिले आहेत. मात्र त्यांच्या दोन्ही पत्नींनी एकमेकांना कधीच भेटण्याचा प्रयत्न केला नाही. हेमासोबत लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी एक नवीन घर खरेदी केलं होतं. जिथे ते अभिनेत्रीसोबत राहतात. एकाच व्यक्तीसोबत या दोघींनी वेगळा संसार थाटला आहे. हेमाच्या बायोग्राफीमध्येसुद्धा ही गोष्ट उघड करण्यात आली आहे की, आजपर्यंत हेमा आणि त्यांच्या दोन मुली ईशा आणि आहाना यांनी प्रकाश कौरच्या घरात प्रवेश केलेला नाही. मात्र, ईशा एकदा तिच्या सावत्र आईला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला भेटायला आली होती. ही गोष्ट 2015 मध्ये घडली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा देओल वडील धर्मेंद्र यांच्या पहिल्या घरी गेली होती. त्याठिकाणीच त्यांची पहिली पत्नी प्रकाशकौरसुद्धा राहते. धर्मेंद्र यांचा भाऊ अजित देओल एकदा खूप आजारी असताना ही गोष्ट घडली होती. त्यांनी घरातील सर्व मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांनी ही बाब हेमा यांच्या मुलींनाही सांगितली. त्यानंतर ईशा त्यांना भेटण्यासाठी धर्मेंद्र यांच्या पहिल्या घरी गेली होती. त्याचा सावत्र भाऊ म्हणजेच सनी देओलने ईशाची काका अजितशी ओळख करुन दिली होती.यानंतर ईशा देओल आपली सावत्र आई प्रकाश कौरला भेटली. त्यांनी ईशाचं मनापासून स्वागतकेलं होतं. इतकंच नव्हे तर तिचा चांगला पाहुणचारही केला होता. ही घटना त्याकाळात प्रचंड चर्चेत आली होती.