देवों के देव महादेव फेम टीव्ही अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) गुपचूप लग्न उरकून घेतले आहे. ना लग्नाची चर्चा ना काही त्याने डायरेक्ट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
मोहित रैनाने नवीन वर्षावर चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. त्याने त्याच्या लग्नाचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत.
मोहितने अदितीसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे फोटो शेअर करताच चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मोहित रैनाने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे, तर अदितीने पेस्टल रंगाचा लेहेंगा घातला आहे. दोघंही खूप सुंदर दिसत आहे.
मोहित रैनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याने देवों के देव महादेवमध्ये भगवान शिवाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोतृकप्रियता मिळाली.
यासोबतच मोहितने बंदिनी व उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटात देखील विकी कौशलसोबत काम केले आहे. ( फोटो साभार- Mohit Raina इन्स्टा पेज)