देवमाणूस मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; डॉ. अजितकुमारचा खरा चेहरा समोर येणार?

देवमाणूस मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; डॉ. अजितकुमारचा खरा चेहरा समोर येणार?

देवमाणूस (Devmanus) मालिकेमध्ये लवकरच एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. अजितकुमारचं खरं रुप मंजुळा समोर आणणार का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर: झी मराठीवर सुरू झालेल्या देवमाणूस (Devmanus) या मालिकेनं फारच कमी वेळ रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. चांगली कामं करण्याचं नाटक करुन डॉक्टर अजितकुमारने अनेक गावातल्या माणसांच्या मनात अगदी देवमाणसाचं स्थान मिळवलं आहे. त्याने केलेली सगळी पाशवी कृत्य आजपर्यंत सर्वांच्या समोर आली नव्हती पण मंजुळाच्या गावात येण्यामुळे अनेक बदल घडण्याची शक्यता आहे.

गावात आलेल्या मंजुळाची अजितला भूरळ पडली आहे. पण मंजुळाचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणा यामुळे अजितच्या जाळ्यात ती सहजपणे अडकत नाही. मंजुळाने वारंवार अपमान केल्याने पेटून उठलेला अजित तिच्या घरात घुसून तिने लपवलेलं रहस्य शोधायचं ठरवतो. मंजुळाच्या घरात घुसण्यात त्याला यश मिळतं पण त्याचवेळी मंजुळा घरात येते आणि अजितला खेचून दाराबाहेर आणते आणि सगळ्या गावासमोर त्याचा पाणउतारा करते. गावात देवमाणूस म्हणून प्रतिमा असलेल्या अजितचा गावासमोरच अपमान होणार आहे. अजित ही बाजी उलटवू शकेल की गावकऱ्यांच्या मनातली त्याची देवमाणूस ही प्रतिमा पुसून टाकली जाईल? हा सगळं प्रेक्षकांना 1 डिसेंबरलाच समजणार आहे.

देवमाणूस ही मालिका त्यातली पात्रे आणि रंजक, रहस्यमयी कथानकामुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणित मालिकेत उत्कंठा वाढत आहे. येत्या काळातही मंजुळा आणि डॉ. अजितकुमार देव यांच्यातली चुरस अधिकाधिक रंगत जाणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 29, 2020, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading