मुंबई, 22- मराठी मनोरंजन विश्वात दररोज कोणता ना कोणता कलाकार चारचाकी तर कोण घर घेताना दिसत आहेत. कोरोनानंतर सगळ चांगल्यापणे सुरू झाले आणि मराठी मनोरंजन विश्वाला आच्छे दिन आलेत असेच म्हणावे लागेल. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी मागील काही दिवसात गाडी घेण्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. असाच एक सुखाचा क्षण देवमाणूस मालिकेतील अभिनेत्रीने ( asmita deshmukh ) देखील अनुभवलेला पाहायला मिळतो आहे. देवमाणूस या मालिकेतील डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने नुकतीच कार ( asmita deshmukh new car ) खरेदी केली. तिनं देखील याचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अस्मिता देशमुख हिने तिच्या इन्स्टाला एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, न्यू फॅमिली मेम्बर. अस्मिताने किया कॅरेन्स या चारचाकीची खरेदी केली आहे. या चारचाकीची किंमत 10 लाख ते 15 लाखांपर्यंत आहे. चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवी कार घेण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर सहज दिसत आहे. ही तिची पहिलीच कार आहे. वाचा- हृता दुर्गुळे-प्रतीक शाहने हनिमूनसाठी निवडलं ‘हे’ ठिकाण, शेअर केले रोमँटिक PHOTO अस्मिताचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले आहे. लहानपणापासून अस्मिता सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायची. पुढे कॉलेजमध्ये असताना नाटकातून अभिनयाची संधी मिळत गेली. यातूनच तिला काही गाण्यातून झळकण्याची संधी मिळाली.
अस्मिताची झी मराठीवरील देवमाणूस ही पहिली मालिका होय. या मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मालिकेतील डिंपल आणि टोण्याची नोकझोक सुपरहिट झाली होती. डिंपल डॉक्टरला मदत करते मात्र या बदल्यात आपले घर चालावे आणि हिरोईन बनता यावे म्हणून ती त्याच्याकडून मोबदला देखील घेताना दिसते. आता पाहिल्या पर्वानंतर देवमाणूस 2 यात देखील ती दिसत आहे. यामध्ये तिन्ह डॉक्टरसोबत लग्न केलं आहे.