फेब्रुवारी हा महिना अनेकांसाठी खास असतो. या महिन्यात अनेकजण आपल्या प्रेमाची कबुली देत असतात. अशातच जर काही रोमँटिक चित्रपट किंवा वेबसीरीज पाहायला मिळाल्या तर? येत्या फेब्रुवारी महिन्यात दीपिका पादुकोणच्या सुपरबोल्ड 'गेहेराइयां' पासून ते तापसी पन्नूच्या 'लूप लपेटा' पर्यंत अनेक चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत.
येत्या 4 फेब्रुवारीला रिचा चड्ढा, प्रतीक गांधी स्टारर 'द ग्रेट इंडियन मर्डर' ही थ्रिलर सीरिज डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. यामध्ये आशुतोष राणा, रघुवीर यादव, अमेय वाघ, जतिन गोस्वामी, शारिब हाश्मी असे अनेक कलाकारआहेत.
तसेच 4 फेब्रुवारीला अभिनेत्री तापसी पन्नूचा 'लूप लपेटा' हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा एक कॉमेडी रोमँटिक चित्रपट आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. यामध्ये तापसीसोबत ताहिर राज भसीन दिसणार आहे.
11 फेब्रुवारीला दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीचा बहुचर्चित 'गेहेराइयां' रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दीपिका आणि सिद्धांतने अनेक बोल्ड सीन दिल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या दोघांसोबत अनन्या पांडेसुद्धा आहे. चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.
तसेच 4 फेब्रुवारीला इंग्लिश सीरिज 'रीचर' सुद्धा भेटीला येणार आहे. यामध्ये एलन रिचसन, मॅल्कम गुडविन, क्रिस वेबस्टर, हार्वे गिलन हे कलाकार दिसणार आहेत.
11 फेब्रुवारीला आणखी एक इंग्लिश सीरिज 'आय वॉंट यू बॅक' रिलीज होणार आहे. ही एक रोमँटिक कॉमेडी सीरिज आहे.