अभिनेत्री दीपिका पादुकोणची तशी प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय असते. मात्र आजची पोस्ट थोडी खास आहे. कारण या पोस्टमध्ये दीपिकाने आपल्यासोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्टार प्लेयर पी. व्ही. सिन्धुसोबत दिसून येत आहे.
दीपिका आणि सिंधू या फोटोंमध्ये बॅडमिंटन खेळताना दिसून येत आहेत. तसेच दीपिकाने आपल्या फोटोंना कॅप्शन देत 'कॅलरी बर्न विथ पी. व्ही. सिंधू' असं म्हटलं आहे. दीपिकाने हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
दीपिका पादुकोण आणि पी. व्ही. सिंधूमध्ये दिवसेंदिवस मैत्री अधिकाधिक घट्ट होताना दिसून येत आहे. नुकताच अय दोघींनी एकत्र डिनरसुद्धा घेतला होता. यावेळी रणवीर सिंगसुद्धा त्याच्यासोबत उपस्थित होता. हे फोटोही मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते.
तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर करत, आफ्टर बॅडमिंटन ग्लो असं म्हटलं होतं. यावर सिंधूने मजेशीर कमेंटसुद्धा दिली होती.
पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये नुकताच टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं होतं. ऑलिम्पिकमध्ये सलग दोन वैयक्तिक पदक जिंकणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोणबद्दल सांगायचं झालं तर, ती आगामी काळात शाहरुख खानसोबत 'पठाण' चित्रपटात झळकणार आहे. तसेच फायटर आणि इंटर्नमध्येसुद्धा ती दिसणार आहे.