रिया जेलबाहेर, दीपिका मुंबईबाहेर; बॉलिवूड बॅक टू नॉर्मल येतंय?

रिया जेलबाहेर, दीपिका मुंबईबाहेर; बॉलिवूड बॅक टू नॉर्मल येतंय?

बॉलिवूडसाठी बुधवारचा दिवस महत्वाच्या घडामोडींचा ठरला. NCB प्रकरणात अटकेमध्ये असलेली रिया चक्रवर्ती जेलच्या बाहेर पडली आहे तर बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण मुंबईबाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे. ती पुन्हा गोव्याला शूटिंगसाठी रवाना होत आहे.

  • Share this:

मुंबई 07, ऑक्टोबर: ड्रग्ज कनेक्शनमध्ये तुरुंगामध्ये असणाऱ्या रिया चक्रवर्तीला मुक्त करण्यात आलं आहे. तब्बल 28 दिवसांनी रिया तुरुंगाबाहेर आली आहे तर ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आता शुटिंगसाठी सज्ज झाली आहे. शुटिंगसाठी दीपिका गोव्याला रवाना होणार आहे. NCBने चौकशीसाठी बोलवल्यामुळे दीपिकाला गोव्यातलं शूट अर्धवट सोडून मुंबईला यावं लागलं होतं. दीपिका गोव्यामध्ये शकुन बत्रा यांच्या सिनेमाच्या शुटिंगासाठी जाणार आहे. या सिनेमात दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचीसुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे. गोव्यामध्ये गेले अनेक दिवस सिनेमाचं शूट सुरू होतं. पण दीपिकाचं नाव ड्रग्ज कनेक्शनसोबत जोडलं गेल्यामुळे तिला शूट अर्धवट सोडून यावं लागलं होतं. दीपिकाच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा सिनेमाचं शूट सुरू होतं अशी माहिती मिळत आहे. अनन्या आणि सिद्धार्थवर चित्रित केले जाणारे सिन यावेळी पूर्ण करुन घेण्यात आले.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या आत्महत्येनंतर सुरू असलेल्या तपासामध्ये ड्रग्ज कनेक्शनचा अँगल समोर आला. त्यामध्ये दीपिकासोबतच सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्यासह बॉलिवूडमधलीन काही बड्या चेहऱ्यांची नावं समोर आली. त्यासंदर्भात अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) दीपिकाला चौकशीसाठी मुंबईमध्ये बोलवलं होतं.

2017 साली दीपिकाने ड्रग्जच्या मागणीसंदर्भात केलेलं चॅट उघडकीस आलं होतं. या चॅटमध्ये तिने आपली मॅनेजर करिश्माकडे ‘माल’ आहे का अशी विचारणा केली होती. या चॅटमुळे दीपिकाची अनेक तास चौकशी करण्यात आली होती. मी सुद्धा या चॅटचा एक भाग आहे हे दीपिकाने कबूल केलं होतं. या चौकशीनंतर दीपिकाचा फोनही जप्त करण्यात आला होता. ड्रग्ज कनेक्शनसंदर्भात दीपिकाला अद्यापही क्नीनचीट देण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळत आहे. ड्रग पेडरलर्स आणि त्यांनी कोणाकोणाला ड्रग्जचा सप्लाय केला यादृष्टीने सध्या NCBचा तपास सुरू आहे. यानंतर पुन्हा दीपिकाची चौकशी होणार का? आणि चौकशी झाली तर त्याचा तिच्या करिअरवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 7, 2020, 10:52 PM IST

ताज्या बातम्या