दीपिका पदुकोण आणि डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani) या चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. 18 डिसेंबर 2015 ला हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यामुळं या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी आणि जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी दीपिका पदुकोण गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या सेटवर गेली होती.
मुंबईतील फिल्मसिटीमध्ये गंगूबाई काठियावाडी या सिनेमाचे शूटिंग सुरु असून संजय लीला भन्साळी याचे डायरेक्शन करत आहेत. (फोट: Instagram @deepikapadukone)
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या सेटवर दीपिका जवळपास 3 ते 4 तास होती. (फोटो Instagram @deepikapadukone)
सेटवर दोघांनी एकत्र जेवणाचा देखील आस्वाद घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी दोघांनी साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद घेत चित्रपटाच्या आठवणी जागवल्या. (फोटो Instagram @deepikapadukone)
दीपिका पदुकोण हिने चित्रपटाच्या सेटवर अचानक भेट दिल्याने संजय लीला भन्साळी यांना खूप आनंद झाला. गंगूबाई…मध्ये मुख्य भूमिकेत आलिया भट्ट चमकणार आहे.