जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 34 वर्षांपूर्वी आई मला सोडून गेली... स्मिता पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलाची भावुक पोस्ट

34 वर्षांपूर्वी आई मला सोडून गेली... स्मिता पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलाची भावुक पोस्ट

34 वर्षांपूर्वी आई मला सोडून गेली... स्मिता पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलाची भावुक पोस्ट

स्मिता पाटील (Smita Patil) यांची आज पुण्यतिथी. त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरने (Prateik Babbar) आपल्या आईसाठी एक पोस्ट लिहिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 डिसेंबर: मी रात टाकली.. पासून ते अगदी आज रपट जाए तो… अशी अनेक बहारदार गाणी पाहिली की आठवण येते स्मिता पाटील (Smita Patil) यांची. सहज सुंदर अभिनय हा त्यांचा हुकमी एक्का. स्मिता पाटील यांची सिनेसृष्टीतील कारकिर्द सुसाट सुरू असताना अचानक एक दिवस आक्रीत घडलं. स्मिता पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाला धक्का बसला. स्मिता पाटील यांच्या निधनाला आज 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा प्रतिक बब्बरने (Pratik Babbar) आईसाठी एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रतीक बब्बरने आपल्या आईचा फोटो शेअर करत लिहीलं आहे, ‘34 वर्षांपूर्वी याच दिवशी आई आम्हाला सोडून निघून गेली. एवढ्या वर्षात माझी आई नक्की कशी असेल याची छबी मी माझ्या मनात निर्माण केली आहे. माझी आई एक परिपूर्ण स्त्री होती. एक पर्फेक्ट महिला…एक पर्फेक्ट रोल मॉडल. प्रत्येक लहान मुलीला तिच्याकडे बघून तिच्यासारखंच व्हावसं वाटेल अशी ती होती. माझी आई एक अशी स्त्री होती जी आई म्हणून आपल्या मुलाला कधीच एकटं पडू देणार नाही. मनाने ती अजूनही माझ्यासोबत असते.’ प्रतीक पुढे लिहीतो ‘माझी आई दरवर्षी माझ्याप्रमाणेच तरुण होते. आताही ती 65 वर्षाची तरुणी आहे. माझ्या मनामध्ये ती कायमच जिवंत राहील. माझी आई माझ्यासाठी प्रचंड महत्वाची व्यक्ती आहे. ती माझ्यासाठी सुपर लेजेंड आहे.’

जाहिरात

स्मिता पाटील यांनी आपल्या 10 वर्षाच्या करिअरमध्ये जवळजवळ 40 सिनेमांमध्ये काम केलं. उत्कृष्ट अभिनयासाठी 2 राष्ट्रीय पुरस्कार आणि इतर पुरस्कारही त्यांनी मिळवले. स्मिता पाटील यांच्या मृत्यूच्या एक वर्षापूर्वी 1985 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात