• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'Corona Vaccination म्हणजे स्कॅम' म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस

'Corona Vaccination म्हणजे स्कॅम' म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस

लसीकरण हा खूप मोठा घोटाळा (Corona vaccination scam) असून, हा सर्व राजकीय खेळ असल्याचा दावा या अभिनेत्याने केला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: कोरोनाच्या विषाणूवर (Coronavirus vaccination) मात करण्यासाठी लसीकरण (vaccination Updates) हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं सगळ्या जगानं मान्य केलं आहे. जगभरातील सर्व देश वेगानं लसीकरण करून कोरोनाचा धोका कमी करण्याच्या प्रयत्नात असून आपल्या देशातही लसीकरण झपाट्यानं सुरू आहे. जितक्या लवकर लसीकरण पूर्ण होईल, तितक्या लवकर लॉकडाउन, सुरक्षा नियम हे निर्बंध दूर होतील. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. ही जागरूकता निर्माण करण्याच्या मोहिमेत बॉलिवूडसह इतर क्षेत्रातील सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. त्याचवेळी काही लोक मात्र लसीकरण हा खूप मोठा घोटाळा (Corona vaccination scam) असून, हा सर्व राजकीय खेळ असल्याचा दावा करत आहेत. यामध्ये काही प्रसिद्ध व्यक्तीही आघाडीवर आहेत. यातीलच एक नाव आहे अभिनेता बिजय जे आनंद (actor Bijoy Anand). लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, ‘शेरशाह’फेम (Shershah Film) अभिनेते विजय आनंद यानं लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा घोटाळा असून सगळा राजकीय खेळ असल्याचा आरोप त्यानं केला आहे. अजय देवगण आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘प्यार तो होना ही है’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या विजय आनंद यांनी अनेक चित्रपट, मालिकांमधून काम केलं आहे. अलीकडेच आलेल्या ‘शेरशाह’ चित्रपटात त्यानं कियारा अडवाणीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला विजय आनंद एक लोकप्रिय योग शिक्षकही (Yoga Teacher) असून जगभर त्याचे विद्यार्थी आहेत. सर्जरीऐवजी निवडला असा मार्ग; रेमो डिसूजाच्या पत्नीने घटवलं 2 वर्षांत 40 किलो वजन विजय आनंद याच्या मते, ‘माझ्यासाठी माझे शरीर एक मंदिर आहे. मला माझ्या शरीरात कसल्याही प्रकारची रसायने टाकायची (Chemicals) नाहीत. लस न घेतल्यानं लंडनमध्ये शूटिंग होणारे दोन चित्रपट तसंच सर्बियामध्ये शूटिंग होणारी एक मोठी वेब मालिका आपण गमावली असल्याचंही त्यानं सांगितलं. दुबईमध्ये होणाऱ्या पुरस्कार समारंभालाही आपण हजर राहू शकलो नाही. एक व्यावसायिक म्हणून आपण हे सर्व अनुभवले आहे. कामाच्या अनेक संधी आपण गमावल्या आहेत; तरीही लस घेणार नाही हे पक्के ठरले आहे, असं त्यानं नमूद केलं. Bigg Boss Marathi3:पहिल्याच दिवशी मीराचा तुफान राडा,कोण होणार नॉमिनेट?पाहा VIDEO ‘हा मानव जातीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे, अशी माझी खात्री आहे. मी माझ्या या भूमिकेशी ठाम आहे. मला काम मिळावं, नोकरी करायची आहे, असं काहीही नाही. मी सगळ्या कामांना नकार दिला आहे. मला प्रवास करता यावा किंवा पैसे कमावता यावेत म्हणून मी माझ्या भूमिकेशी कोणतीही तडजोड करणार नाही,’ असंही विजय आनंद यानं ठामपणे म्हटलं आहे.
First published: