Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Indian idol 12 ला Covid-19 ने ग्रासलं; आदित्य नारायणनंतर आता स्पर्धकालाही कोरोनाची लागण

Indian idol 12 ला Covid-19 ने ग्रासलं; आदित्य नारायणनंतर आता स्पर्धकालाही कोरोनाची लागण

Indian Idon 12 चं सूत्रसंचालक करणाऱ्या आदित्य नारायणला कोरोना झाला होता. आता बायो बबलमध्ये राहूनही एका स्पर्धकाला कोरोनाची (corona positive) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Indian Idon 12 चं सूत्रसंचालक करणाऱ्या आदित्य नारायणला कोरोना झाला होता. आता बायो बबलमध्ये राहूनही एका स्पर्धकाला कोरोनाची (corona positive) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Indian Idon 12 चं सूत्रसंचालक करणाऱ्या आदित्य नारायणला कोरोना झाला होता. आता बायो बबलमध्ये राहूनही एका स्पर्धकाला कोरोनाची (corona positive) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 एप्रिल- बॉलीवूड आणि छोट्या पडद्यावरील कोरोनाचं संकट गडद होतं चाललं आहे. काही दिवसांपूर्वी इंडियन आयडॉल12 (indian idol 12) त्या कार्यक्रमातील निवेदक आदित्य नारायण याला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर आता या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक असणारा पवनदीप राजन (pavandeep rajan) यालासुद्धा कोरोनाची (corona positive) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

इंडियन आयडॉल या कार्यक्रमामध्ये देशातील विविध राज्यातून गाण्यासाठी मुलं-मुली सहभागी होतं असतात. इंडिअन आयडॉलचा सध्या 12 वा सीजन चालू आहे. यामध्ये पवनदीप राजन हा उत्तराखंडहून आलेला स्पर्धक आहे. पवनदीपने आपल्या मधुर आवाजाने श्रोत्यांचं मन जिंकून घेतलं आहे. पवनदीपला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं. त्याच्या गाण्याचे व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.

पवनदीपला काही दिवसांपासून थोडासा ताप जाणवत होता. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आणि त्याचं हा अहवाल पॉजिटीव आला आहे. त्यामुळे सध्या पवनदीपला हॉटेलच्या एका खोलीत क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पवनदीपला कोरोनाची लागण झालेलं समजल्या नंतर कार्यक्रमातील सर्व स्पर्धक, परीक्षक, सेटवरील कर्मचारी या सर्वांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र अजून या सर्वांचे अहवाल अजून मिळालेले नाहीत.

अत्यंत काळजी घेत यातील बऱ्याच स्पर्धकांना जुहूच्या एका हॉटेलमध्ये बायो बबल मध्ये ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता, गायक आणि या कार्यक्रमाचा निवेदक आदित्य नारायण याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अभिनेता जय भानुशाली त्याच्या जागी निवेदन करत आहे.

" isDesktop="true" id="538338" >

इंडिअन आयडॉल 12 हा कार्यक्रम सतत चर्चेत असतो. तर कधी विवादांना सुद्धा बळी पडतो. गेल्या आठवड्यामध्ये या कार्यक्रमातून अतिशय उत्तम गायक कलाकार असणारा नचिकेत लेले हा बाहेर झाला होता. त्यामुळे नचिकेतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला होता. आणि कार्यक्रमावर अनेक आरोपसुद्धा लावण्यात आले होते. नचिकेत हा मुंबईच्या डोंबिवली मध्ये राहणारा आहे.

इंडियन आयडॉल मध्ये पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, सवाई भट्ट,सायली कांबळे, अरुनिता कांजीलाल, शन्मुखप्रिया, अंजली गायकवाड व अन्य काही स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा सुरु आहे. या कार्यक्रमामध्ये गायिका नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी हे परीक्षक आहेत.

(हे वाचा: 'Go Corona Go' म्हणतं प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला Video)

पवनदीप राजन हा एक उत्तम गायक तर आहेच. त्याचबरोबर तो एक उत्तम गिटार, ड्रम वादक सुद्धा आहे. तो विविध प्रकारचे वाद्य खूप चांगल्या पद्धतीने वाजवू शकतो. पवनदीप सध्या सोशल मीडियावर सुद्धा खुपचं प्रसिद्ध झाला आहे. तो सतत आपल्या गाण्याचे किंवा इतर स्पर्धकांसोबत सेटवरील मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असतो.

आता काही दिवस पवनदीप रंगमंचावर येऊन गाणं म्हणू शकणार नाही. त्याला आता त्या हॉटेलच्या खोलीत बसूनचं आपल्या गाण्याचं कौशल्य दाखवावं लागणार. या आठवड्यात इंडिअन आयडॉल मध्ये संगीतकार कल्याणजी यांची उपस्थिती असणार आहे.

First published:

Tags: Coronavirus, Reality show, Tv