मुंबई, 24 फेब्रुवारी- बॉलिवूडमध्ये अभिनेत्री (Boollywood Actress) आणि फिल्म मेकर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री पूजा भट्टने (Pooja Bhatt) 90 च्या दशकात अनेक चित्रपट केले. अतिशय सुंदर पूजा भट्टची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती आणि लोक तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असायचे. आज पूजा भट्ट आपला 50 वा वाढदिवस (50th Birthday Today) साजरा करत आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड पदार्पण- पूजा भट्टच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1989 मध्ये ‘डॅडी’ या सिनेमातून झाली होती. हा चित्रपट तिचे वडील महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली बनला होता. पूजा भट्ट वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी अभिनेत्री बनली होती. अभिनेत्री म्हणून ती चांगलीच गाजली होती. यानंतर तिने अभिनयासोबतच दिग्दर्शनातही ठसा उमटवला आहे. बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींमध्ये पूजा भट्टची गणना केली जाते ज्या प्रत्येक मुद्द्यावर आपला दृष्टिकोन अगदी स्पष्टपणे मांडतात. परंतु एकेकाळी पूजा भट्टही वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तिला ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिचा घटस्फोट असो किंवा दारूचे व्यसन असो, पूजा भट्ट नेहमीच स्वतः च्या मर्जीने जगत आलीय. पण, एक वेळ अशी होती जेव्हा ती अभिनेत्रींसोबतच्या भांडणांमुळेही चर्चेत आली होती.इतकंच नव्हे तर पूजा भट्टने स्वतः चे वडील महेश भट्ट यांना किस करत आक्षेपार्ह फोटोशूट करत खळबळ माजवली होती. या प्रकरणावर अनेकांनी कठोर शब्दांत टीका केली होती. हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. करिश्मा कपूरसोबत टोकाचा वाद- याबद्दल सांगताना असं म्हटलं जातं की, या भांडणाचे कारण दुसरे काही नसून निव्वळ एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा होती. तसेच पूजा भट्टने करिश्मा कपूरच्या आई-वडिलांबद्दल म्हणजेच रणधीर कपूर-बबिता यांच्याबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या होत्या. तेव्हा बबिता आणि रणधीर कपूर वेगळे राहू लागले होते. करिश्मा कपूरने पूजा भट्टकडून काही अपमानास्पद गोष्टी ऐकल्या तेव्हा करिश्मा कपूर नाराज झाली होती.एका मुलाखतीत याबद्दल बोलताना करिश्मा कपूर म्हणाली होती, ‘माझी काय चूक आहे ते मला सागा?. माझ्या आई-वडिलांबद्दल वाईट बोलणारी पूजा भट्ट आहे आणि मी तिला फक्त चोख प्रत्युत्तर दिले कारण तिला माझ्या पालकांबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.