Home /News /entertainment /

गँग्ज ऑफ वासेपूर 2मधील अभिनेत्याविरोधात कोट्यवधींची अफरातफर केल्याची तक्रार

गँग्ज ऑफ वासेपूर 2मधील अभिनेत्याविरोधात कोट्यवधींची अफरातफर केल्याची तक्रार

गँग्ज ऑफ वासेपूरसारख्या गाजलेल्या चित्रपटातील स्क्रीन रायटरविरोधात कोट्यवधींची अफरातफर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    शिखा धारिवाल, मुंबई, 01डिसेंबर: गँग्स ऑफ वासेपूर, छलांग आणि हलचलसारख्या गाजलेल्या सिनेमांच्या स्क्रीन रायटरविरोधात फसवणुकीचा तक्रा दाखल करण्यात आली आहे. झिशान कादरी (Zeishan Quadri) असं या स्क्रीन रायटरचं नाव आहे. त्याने गँग्ज ऑफ वासेपूरच्या दुसऱ्या Gangs of Wasseypur - Part 2 भागात कामही केलं आहे. अंधेरीच्या आंबोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फ्रायडे टू फ्रायडे एंटरटेनमेंट (Friday to Friday Entertainment) ही झिशानची कंपनी आहे. झिशानने कोट्यवधींची अफरातफर केल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. प्रोड्यूसर जतिन सेठींनी सांगितलं की, झिशान कादरी आणि त्यांच्या कंपनीमध्ये एका वेबसीरिजसाठी करार झाला होता. पण झिशानने माझी फसवणूक केली. वेब सीरिजमध्ये पैसे गुंतवतो असं सांगून माझ्याकडून पैसे उकळले आणि खरतर ते पैसे त्याने गुंतवलेच नव्हते. यामुळे मला कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. झिशान कादरी यांच्या तक्रारीमध्ये प्रियांका बसी या महिलेचाही उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितलं की, या फसवणुकीमध्ये प्रियांका बसी ही अभिनेत्रीही सहभागी होती. प्रियांका बसी अभिनेत्री आहेच पण ती झिशानसोबत दिग्दर्शनामध्येही सहभागी होती. आता या प्रकरणी झिशानला अटक होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood, Crime

    पुढील बातम्या