मुंबई, 22 मे- प्रसिद्ध कॉमेडियन
(Comedian) आणि 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'
(Comedy Nights With Kapil) फेम गुत्थी' म्हणजेच सुनील ग्रोव्हर
(Sunil Grovher) फारच लोकप्रिय आहे. तो एक उत्तम एंटरटेनर आहे आणि त्याला लोकांना कसं हसवायचं हे चांगलंच माहित आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलने सध्या सोशल मीडिया पूर्णपणे व्यापलेला आहे. अशा परिस्थितीत त्याने त्याच्या लोकप्रिय पात्र गुत्थीचा फोटो एडिट करुन तो मजेशीररित्या शेअर केला आहे.
सुनील ग्रोव्हरने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'फ्रेंच रिव्हिएरा' असेही लिहिले आहे. हिना खानलाही सुनील ग्रोव्हरच्या फोटोवर कमेंट केल्याशिवाय राहवलं नाही. त्याने अनेक हसवणाऱ्या इमोजी शेअर करत 'सुनील' असं लिहिलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असेलल्या या फोटोमध्ये गुत्थीने वेस्टर्न गाऊन घातलेला दिसत आहे. आणि त्याचवेळी जांभळ्या रंगाचे मोठे धनुष्यही दिसत आहे. 'गुत्थी' चे टिपिकल एक्सप्रेशन पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. सुनीलची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. चाहत्यांसोबतच स्टार्सही कमेंट करत आहेत.
अभिनेता रोनित बोसनेही त्याच्या फोटोवर कमेंट करत लिहिलंय, 'डूड तुम तो छा गये.' याशिवाय मौनी रॉय, रसिका दुग्गल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सुनील ग्रोव्हरच्या फोटोवर कमेंट केली आहे.सध्या सुनीलचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचे चाहते हा फोटो पाहून हसून लोटपोट होत आहेत.
सुनील ग्रोवरबद्दल सांगायचे तर, 'कॉमेडी नाइट विथ कपिल'मधील 'गुत्थी' या व्यक्तिरेखेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या शोमध्ये त्याने अनेक व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. ज्यामध्ये डॉ. मशूर गुलाटी आणि रिंकू भाभी यांची भूमिकाही खूप लोकप्रिय झाली होती. पण, कपिल शर्मासोबतच्या भांडणामुळे त्याने कपिलचा शो सोडला.टीव्ही शोबद्दल बोलायचे झाले तर, सुनील ग्रोवर शेवटचा 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान'मध्ये दिसला होता. सुनील ग्रोव्हर सध्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे.तसेच तो सोशल मीडियावर प्रचंड व्यग्र असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.