मुंबई, 15 नोव्हेंबर : आपल्या विनोदी शैलीने लोकांना खळखळून हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोवर सतत चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून विविध फोटो आणि मजेशीर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या विनोदाचे अनेक चाहते असून तो आपल्या चाहत्यांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच कॉमेडियन सुनील ग्रोवरची एक पोस्ट समोर आलीये ज्यामध्ये तो रस्त्यावर शेंगदाणे विकताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगल्याचं दिसत आहे. सुनील ग्रोवरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुनील रस्त्यावर शेंगा भाजताना आणि शेंगदाणे विकताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते थोड्यावेळासाठी संभ्रमात पडले आहेत की एवढ्या मोठ्या अभिनेत्यावर शेंगदाणे विकण्याची वेळ कसं काय आली? सुनीलची हा व्हिडीओ काही वेळातच इंटनेटवर धुमाकूळ घालताना दिसला. अद्यापही या व्हिडीओची चर्चा होतीये. पोस्ट शेअर करत सुनीलने लिहिले, ‘खा खा खा’.
सुनीलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ‘कपिल शर्मा शो सोडल्यानंतर ही परिस्थिती झालीये, पत्ता सांगा आम्ही पण येतो, शेंगदाणे कितीली दिले भैया, परत कपिल शर्मा शोमध्ये या’, अशा अनेक प्रतिक्रिया सुनीलच्या व्हिडीओवर येत आहेत. सुनीलने हा व्हिडीओ फक्त मनोरंजना साठी शेअर केला आहे. असे अनेक व्हिडीओ तो कायमच शेअर करत असतो.
दरम्यान, द कपिल शर्मा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोवर आता चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसतो. नुकत्याच आलेल्या गुडबाय चित्रपटात तो दिसला होता. तो लवकरच जवान चित्रपटाती दिसणार आहे. सुनीलला अजून कपिल शर्मामध्ये परत येण्यास चाहते विनंती करत असतात. त्याचं डॉ. मशहूर गुलाटी पात्र प्रेक्षकांना खूप आवडायचं. असूनही प्रेक्षक त्याला शोमध्ये मीस करतात. कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाल्यामुळे सुनीलने हा शो सोडला होता. मात्र आता त्यांचे नाते आता सुधारत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे दोघे चांगले मित्र तर आहेत मात्र एकत्र काम करणं थोडं अवघड आहे.