जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियाला रामराम, VIDEO शेअर करत म्हणाला...

कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियाला रामराम, VIDEO शेअर करत म्हणाला...

कॉमेडियन मुनव्वर फारुकी

कॉमेडियन मुनव्वर फारुकी

प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. त्याच्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी चाहते खूप गर्दी करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 ऑक्टोबर : प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. त्याच्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी चाहते खूप गर्दी करतात. याशिवाय तो त्याच्या गाण्यांमुळेही चर्चेत असतो. मात्र काही दिवसांपासून मुनव्वर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मुनव्वर आणि त्याची गर्लफ्रेंड नझिलाचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्याचं दिसत आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मुनव्वर फारुकीनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हडिओमध्ये त्यानं सांगितलं की तो सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. मात्र हा ब्रेक किती दिवसांसाठी घेणार आहे याविषयी त्यालाही काही कल्पना नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे तो सोशल मीडियाला रामराम करत आहे. त्याच्या या निर्णयानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

जाहिरात

‘लॉकअप’ सीझन पहिला मुनव्वर फारुकीनं जिंकला. त्याच्यानंतर त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. याशोमध्ये लोकांनी त्याला चांगली पसंती दिली. त्याचा संघर्षही लोकांपर्यंत पोहचला. त्यामुळे त्याची इमेज लोकांच्या मनात आणखीनच बदलली. दरम्यान, कॉमेडियन मुनव्वर फारुकी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन तो चर्चेचा विषय ठरत असतो.

News18लोकमत
News18लोकमत

मुनव्वर आणि त्याची गर्लफ्रेंड नझिला दोघांचे आता ब्रेकअप झाले आहे. मात्र, यामागचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात