कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा राडा, 'या' दोन कलाकारांमध्ये कोल्ड वॉर ?

नुकतीच शोमध्ये आलेली भारती सिंह आणि किकू शारदा या दोन कलाकारांमध्ये कपिलच्या शोच्या सेटवर कोल्ड वॉर चालू झालंय

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2017 05:15 PM IST

कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा राडा, 'या' दोन कलाकारांमध्ये कोल्ड वॉर ?

27 जुलै : कपिल शर्माचा 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या शोच्या मार्गात येणाऱ्या अडचणी संपता संपत नाहीयेत. आधी सुनील ग्रोवरचं शो सोडून जाणं, त्यानंतर शोची टीआरपी घसरणं, आणि काही दिवसांपूर्वी कपिल आजारी पडल्यामुळे शोचं शुटिंग थांबलं होतं. पण आता या शोसमोर एक नवीन अडचण निर्माण झालीय. या शोच्या दोन कलाकारांमध्ये आता कोल्ड वॉर सुरू झालंय.

 

नुकतीच शोमध्ये आलेली भारती सिंह  आणि किकू शारदा या दोन कलाकारांमध्ये कपिलच्या शोच्या सेटवर कोल्ड वॉर चालू झालंय. हे कोल्ड वॉर काही आजचं नाही. 'कॉमेडी सर्कस' या शोमध्ये भारती आणि किकू एकत्र काम करायचे. पण नंतर या दोघांमध्ये भांडण झालं होतं आणि ते दोघं वेगळे झाले होते. त्यानंतर भारतीने किकूसोबत काम केलं नव्हतं. आता पुन्हा कपिलच्या शोमध्ये एकत्र आल्यानंतर या दोघांमध्ये कोल्ड वॉर चालू असल्याची चर्चा आहे.

पण या दोघांनीही या बातम्यांना अफवा म्हटलंय. किकूने या बातम्या खोट्या आहे असं म्हटलंय तर भारतीने किकू हा माझा चांगला मित्र आहे आणि असं काहीही झालेलं नाही असं सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...