नवी दिल्ली, 4 जून : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) 'शॉट' (Shot) नावाच्या डियोड्रेंटच्या विवादास्पद जाहिरातीवर तत्काळ रोख आणला आहे. या जाहिरातीवर तक्रारी आल्यानंतर ते काढून टाकण्याचे आदेश दिली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जाहिरातीच्या नियमांनुसार या प्रकरणात चौकशी केली जात आहे. सोशल मीडियावर मंत्रालयाच्या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे. ट्विटरवरही नेटकरी या कारवाईचं कौतुक करीत आहेत.
या संबंधात जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार, या जाहिरातीत महिलांबाबत चुकीचं चित्रण करण्यात आलं आहे. याशिवाय बलात्काराच्या घटनांना प्रोत्साहन देत आहे.
(Layer'r Shot) Deodorant advertisement blatantly promotes the rape mentality in the country. We've issued notice to Delhi Police that FIR must be registered & ad must be immediately taken down from all platforms: Swati Maliwal, Chairperson, Delhi Commission for Women pic.twitter.com/A200SZ9kGu
— ANI (@ANI) June 4, 2022
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, यूट्यूब आणि ट्विटरला पत्र पाठवून आपल्या प्लॅटफॉर्ममधून हा व्हिडीओ हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या संबंधित दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलीवाल यांनी सांगितलं की, लेयर शॉट डियोड्रेंटची जाहिरात देशात बलात्काराची मानसिकता वाढवत आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, आम्ही दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात प्राथमिक गुन्हा दाखल करायला हवा आणि सर्व जाहिरात प्लॅटफॉर्ममधून तातडीने हटवायला हवेत. या जाहिराती इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँडच्या क्रिकेट मॅचदरम्यान दाखवण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Advertisement, Crime news