मुंबई, 4 जून- साऊथ इंडस्ट्रीत अल्लू-कोनिडेल या कुटुंबाचा दबदबा आहे. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सुपरस्टार आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेते चिरंजीवी होय. चिरंजीवी हे गेल्या अनेक वर्षांपासून साऊथ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांनी अनेक दमदार सिनेमे दिले आहेत. त्यांचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्यांच्याबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासुन एक चिंताजनक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे चाहते चिंतेत आहेत. अभिनेते चिरंजीवी यांना कॅन्सर झाल्याचं धक्कादायक वृत्त व्हायरल होत आहे. आता सर्व प्रकरणावर चिरंजीवी यांनी स्वतः पुढे येत प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं प्रकरण काय?- अभिनेते चिरंजीवी यांनी काही दिवसांपूर्वी एका कॅन्सर सेंटरचं उदघाट्न केलं होतं. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाददेखील साधला होता. परंतु या कार्यक्रमात चिरंजीवी यांनी जे काही सांगितलं त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. या कार्यक्रमानंतर चिरंजीवी यांना कॅन्सर झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. तसेच अभिनेते आता या आजारातून पूर्णपणे बरे झाले असल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र आता स्वतः चिरंजीवींनी समोर येत आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. चिरंजीवीचं ट्विट- चिरंजीवींनी ट्विटरवर एक ट्विट शेअर केलं आहे. यामधून त्यांनी सांगितलं आहे की, ‘त्यांना कॅन्सर झालेला नाहीय. किंवा ते कॅन्सर या आजाराच्या विळख्यात आलेले नाहीयेत. त्यांनी पुढे सांगितलं की, ‘काही दिवसांपूर्वी ते एका कॅन्सर सेंटर उदघाट्नासाठी गेले होते. याठिकाणी त्यांनी सांगितलं की, कॅन्सरबाबत जागरुकता होणं फारच महत्वाचं आहे. त्यासाठी सर्वांनी नियमितपणे आपली आरोग्य तपासणी करुन घ्यायला हवी.
కొద్ది సేపటి క్రితం నేనొక క్యాన్సర్ సెంటర్ ని ప్రారంభించిన సందర్భంగా క్యాన్సర్ పట్ల అవగాహన పెరగాల్సిన అవసరం గురించి మాట్లాడాను. రెగ్యులర్ గా మెడికల్ టెస్టులు చేయించుకుంటే క్యాన్సర్ రాకుండా నివారించవచ్చు అని చెప్పాను. నేను అలర్ట్ గా వుండి కొలోన్ స్కోప్ టెస్ట్…
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) June 3, 2023
त्यांनी काही दिवसांपूर्वी कोलोन स्कोप टेस्ट केला होता. यामध्ये नॉन कॅन्सर पॉलिक्स डिटेक्ट होते. जे काढून टाकण्यात आले होते. पण हे जर वेळेत काढले नसते. तर त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्वांनी असं सतर्क राहून आधीच आरोग्य येणारं संकट टाळावं, असं त्यांनी सांगितलं. परंतु या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढं लिहलंय, ‘या गोष्टीचा काही लोकांनी चुकीचा अर्थ काढून मला कॅन्सर झाला आहे, आणि मी आजारापासून बचावलो आहे अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या आहेत. या गोष्टीमुळे माझे चाहते आणि ओळखीचे लोक घाबरुन गेले आहेत. माझ्या तब्येतीची काळजी करत मला सतत मेसेज येत आहेत. त्यामुळे कृपा करुन अशा अफवा पसरवू नका आणि फालतू अफवा छापू नका’. असं त्यांनी म्हटलं आहे.