जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'खूप थंडी होती, मी आणि भाऊ.... 'दोघांच्याच मैफलीची आठवण सांगताना कुशल बद्रिकेनं शेअर केला खास VIDEO

'खूप थंडी होती, मी आणि भाऊ.... 'दोघांच्याच मैफलीची आठवण सांगताना कुशल बद्रिकेनं शेअर केला खास VIDEO

'खूप थंडी होती, मी आणि भाऊ.... 'दोघांच्याच मैफलीची आठवण सांगताना कुशल बद्रिकेनं शेअर केला खास VIDEO

कुशल बद्रिकेनं (Kushal badrike instagram post) शेअर केलेला BTS VIDEO कमाल viral होत आहे. भाऊ कदमचा आवाज ऐकून तुम्हीही म्हणाल वाहवा!

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 जुलै : झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’( Chala hawa yeu dya show) हा कॉमेडी शो राज्यभर खूप प्रसिद्ध आहे. यातील कलाकार आपल्या काॅमेडी अंदाजानं प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावतात. या कार्यक्रमातील अभिनेता कुशल बद्रिके(Kushal badrike) प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडतो. अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो नेहमीच काही ना काही सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच कुशलनं (Kushal badrike latest post)शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असतो. कुशल बद्रिकेनं इन्स्टाग्रामवर (Kushal badrike instagram)एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं पांडू सिनेमाच्या (Pandu movie) शुटींगच्या दरम्यानचा एक गोड अनुभव शेअर केला आहे. पोस्टमध्ये कुशल सोबत भाऊ कदम (Bhau kadam) देखील पहायला मिळत आहे. पोस्ट शेअर करत कुशलनं लिहिलं की, पांडू सिनेमाच्या शुटींगच्या दरम्यानचा एक video सापडला. खूप थंडी होती आणि आमचा Scène यायला बराच वेळ होता, तेव्हा मस्त शेकोटी पेटवून मी आणि भाऊ गाणी गात बसलो होतो. आमच्या दोघांचीच मैफल…आठवणी कायम मनात घर करून राहतात. कुशलची ही पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. हेही वाचा -  Pankaj Tripathi: ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा एकाच महिन्यात येतो दोनदा बर्थडे, काय आहे हे गुपित? कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेक निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दोघांनी गायलेल्या गाण्याविषयी त्यांचं कौतुकंही केलं जातय. कुशल आणि भाऊ कदमला सोबत पाहणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतं. अशातच या व्हिडीओमध्ये दोघांना पाहून त्यांचे चाहतेही खूप आनंदी आहेत. याआधीही पांडू सिनेमाच्या सेटवरली त्याने काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

जाहिरात

चला हला येऊ द्याच्या सेटवरून कुशल बद्रिके कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्याच्या अभिनयानं त्यानं चाहत्यांच्या मनात आपलं एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. कुशल बद्रिकेने आपल्या अभिनयाने आणि अफलातून विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. त्यामुळेच अभिनेत्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात