जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'त्याने देशासाठी ऑस्कर जिंकला असता...' सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

'त्याने देशासाठी ऑस्कर जिंकला असता...' सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

'त्याने देशासाठी ऑस्कर जिंकला असता...' सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

सुशांत एक असा टॅलेंटेड अभिनेता होता जो देशासाठी ऑस्कर जिंकू शकला असता असं एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या 34 व्या वर्षी सुशांतनं जगाचा निरोप घेतला. त्यानंतर मागच्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये नेपोटीझम वादाला तोंड फुटलं आहे. याशिवाय सुशांतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर झाल्यानंतर त्याच्या टॅलेंटची खूप चर्चा होताना दिसत आहे. अशात आता अभिनेत्री सेलिना जेटलीनं सुद्धा सुशांतच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. सुशांत एक असा टॅलेंटेड अभिनेता होता जो देशासाठी ऑस्कर जिंकू शकला असता, असं सेलिनानं म्हटलं आहे. अभिनेत्री सेलिना जेटलीनं लग्नानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. ‘सीजन्स ग्रीटिंग’ या सिनेमातून तिनं कमबॅक केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेलिनानं तिच्या डिप्रेशनचा अनुभव शेअर केला. सेलिना म्हणाली, हे एक असं आजारपण आहे जे तुमच्या यशाचा आलेख किंवा तुम्ही कसे दिसता, किती श्रीमंत आहात किंवा गरीब यावरून तुमच्याकडे येत नाही. कोणत्याही वयात हे होऊ शकतं. डिप्रेशन हा एक असा आजार आहे जो ठीक केला जाऊ शकतो. पण त्यासाठी त्या व्यक्तीला कोणीतरी सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला इग्नोर करू नका.

जाहिरात

सुशांत बद्दल सेलिना म्हणाली, ‘नैराश्य ही अत्यंत वाईट स्थिती असते. व्यक्ती कितीही श्रीमंत असो किंवा गरीब तो नैराश्यामुळे भरडला जातो. त्याची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. अनेकदा तो चूकीचे निर्णय घेतो. हा अनुभव मी देखील घेतला आहे. सुशांतची देखील अशीच अवस्था झाली असेल. म्हणूनच त्याने असं टोकाचं पाऊल उचललं. अन्यथा अभिनयात इतका तरबेज असलेला एक यशस्वी अभिनेता आत्महत्येचा विचार का करेल? त्याचा अभिनय पाहून मला वाटायचं सुशांत एक दिवस सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव नक्की कोरेल.’

जाहिरात

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पोलीस सध्या त्याच्याशी संबंधीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. जेणेकरून त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण शोधता येईल. ज्यात त्याच्या पर्सनल लाइफ पासून ते प्रोफेशनल लाइफमधील अनेक व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात