मुंबई, 16 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील मराठी रिऍलिटी शो ‘बस बाई बस’ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. याशोमध्ये मनोरंजन ते राजकारणपर्यंतच्या विविध महिला सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. या शोचं वैशिष्ट्यचं असं आहे की, यामध्ये फक्त महिला सेलेब्रेटींना बोलवलं जातं. अभिनेता सुबोध भावेनं या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा संभाळली आहे. दरम्यान या कार्क्रमाचा नवा प्रोमो आता समोर आला आहे. यामध्ये पाहुनी म्हणून महाराष्ट्राची लाडकी श्रेया बुगडेने हजेरी लावली आहे. झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. या कार्क्रमाने आपल्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. सध्या हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये येणाऱ्या प्रत्येक महिला सेलिब्रेटी आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत रंजक खुलासे करताना दिसून येतात. सोबतच सुबोध भावे त्यांना विविध मजेशीर आणि काही गंभीर प्रश्नसुद्धा विचारतो. दरम्यान शोमधील काही महिला कलाकारही सेलेब्रेटींना विविध प्रश्न विचारताना दिसून येतात. इतकंच नव्हे तर या सेलेब्रेटींना शोमध्ये विविध मजेशीर खेळही खेळावे लागतात. नुकतंच ‘बस बाई बस’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री-कॉमेडियन श्रेया बुगडेनं हजेरी लावली आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. यशोमुळे श्रेयाला अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे बस बाई बसच्या मंचावर श्रेयाला बघून प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
(हे वाचा: Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितने आईला वाढदिवसानिमित्त दिली खास भेट; पाहून तुम्हीही व्हाल खुश **)** समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये श्रेयाने आपल्या खाजगी आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केला आहे. बस बाई बसच्या मंचावर श्रेयाला एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला होता. अभिनेत्रींच्या उत्तराने सर्वच थक्क झाले आहेत. यावेळी श्रेयाला विचारण्यात आलं होतं की, तिच्याजवळ चप्पलचे किती जोड आहेत. यावर उत्तर सेट श्रेयाने सांगितलं, माझ्याकडे 200 चप्पलचे जोड आहेत. या उत्तराने सुबोधसह सर्वच चकित झाले आहेत. हा एपिसोड आज रात्री 9.30 वाजता पाहायला मिळणार आहे.