जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रसिध्द टीव्ही अभिनेत्यानं शाळेतच बनवला होता SEX VIDEO, स्वत:चं सांगितला किस्सा

प्रसिध्द टीव्ही अभिनेत्यानं शाळेतच बनवला होता SEX VIDEO, स्वत:चं सांगितला किस्सा

प्रसिध्द टीव्ही अभिनेत्यानं शाळेतच बनवला होता SEX VIDEO, स्वत:चं सांगितला किस्सा

धक्कादायक! प्रसिध्द अभिनेत्यानं काढला आपल्या बेस्ट फ्रेंण्डचा सेक्स व्हिडीओ.

  • -MIN READ
  • Last Updated :

न्यूयॉर्क, 29 नोव्हेंबर : शालेय जीवनातील प्रत्येकाच्या आठवणी या वेगळ्या असता. काहींच्या शालेय आठवणी या कटू असतात, तर काहींच्या जास्तच मजेशीर असतात. मात्र कधी शाळेच अश्लिल चाळे केल्याच्या आठवणी कोणी जगजाहीर सांगत नाही. मात्र एका प्रसिध्द टीव्ही स्टारनं आपल्या शालेय जीवनातील एका धक्कादायक आठवणीचा खुलासा केला आहे. ब्रिटीश टीव्ही स्टार आणि माजी रग्बी खेळाडू जेम्स हस्केलनं (James Haskell) एक धक्कादायक खुलासा केला आहे. जेम्सनं आपल्या शालेज जीवनातील एक खळबळजनक खुलासा केल्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच एका टीव्ही शोमध्ये हस्केलनं त्याच्या शालेय जीवनातील एक धक्कादायक आठवण सांगितली. या मुलाखतीत त्याने, “मी 18 वर्षांचा असताना माझ्या खास मित्राचा त्याच्या 17 वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत शाळेत सेक्स करतानाचा व्हिडिओ त्यांच्या नकळत बनवला होता”, असा खळबळजनक खुलासा केला. जेम्स हस्केलने I’m A Celebrity या शोमध्ये हा किस्सा सांगितला. हे ऐकून त्याच्या तमाम चाहत्यांना धक्काच बसला.

जाहिरात

हस्केलची ही बातमी सर्वात आधी mirror.co.ukनं दिली. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, जेम्स हस्केलने शाळेत असताना असे भयंकर कृत्य केले होते. शाळेत असताना त्यानं आपल्या मित्राचा लपून सेक्स करतानाच व्हिडीओ काढला होता. यावेळी आपला कोणीतरी गुप्तपणे व्हिडिओ काढत आहे याची त्या मुलीला कल्पना देखील नव्हती. इतकेच नाही तर जेम्सने हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही दाखवला होता. जेव्हा ही गोष्ट त्या मुलीला कळाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

2003मध्ये शाळेत ही गोष्ट कळल्यानंतर या तिघांनाही शाळेने निलंबित केले होते. या सर्वांचा उल्लेख त्याने ‘I’m A Celebrity’ या कार्यक्रमात केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात