बॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 46व्या वर्षी निधन, सलमान खानने केली होती आर्थिक मदत

बॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 46व्या वर्षी निधन, सलमान खानने केली होती आर्थिक मदत

फराझ खान (Faraaz Khan) या अभिनेत्याची सलमान खान दीर्घकाळापासून मदत करत होता. बेंगळुरूतील विक्रम हॉस्पिटलमध्ये हा 'मेहंदी' फेम अभिनेता उपचार सुरू होते.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर: बॉलिवूडसाठी 2020 हे वर्ष अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक राहिले आहे. इंडस्ट्रीमधून आणखी एक दु:खद बातमी समोर येते आहे. अभिनेत्री राणी मुखर्जीचा सिनेमा 'मेंहंदी'मध्ये काम केलेला अभिनेता फराझ खान (Faraaz Khan) याचे वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घकाळापासून तो एका आजाराशी झुंज देत होता. बंगळुरूमधील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. सोशल मीडियावर अभिनेत्री पुजा भट्ट (Pooja Bhatt) हिने याबाबत माहिती दिली आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते यांना मोठा धक्का बसला आहे.

बॉलिवूड अभिनेता फराझ खान याच्या निधनाचे वृत्त देताना अभिनेत्री पुजा भट्टने असे म्हटले आहे की, 'मी खूप जड अंत:करणाने ही बातमी शेअर करत आहे की फराझ खान आता आपल्यात नाही. त्याला जेव्हा सर्वाधिक गरज होती त्यावेळी तुम्ही केलेली मदत आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद.'

दरम्यान फराझ खान (Faraaz Khan) या अभिनेत्याची सलमान खान दीर्घकाळापासून मदत करत होता. बेंगळुरूतील विक्रम हॉस्पिटलमध्ये हा 'मेहंदी' फेम अभिनेता उपचार सुरू होते, तेव्हा सलमानने त्याच्या सर्व मेडिकल बिल्सचा खर्च स्वत: दिला होता. कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहने याबबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

फराझला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे बेंगळुरूमधील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. फराझ जवळपास एका वर्षापासून  छातीमध्ये कफ आणि इन्फेक्शनशी झुंज देत होता. फराज खानने राणी मुखर्जीबरोबर मेहंदी, दुल्हन बनूं मैं तेरी आणि फरेब या सिनेमांसह अनेक सिनेमात काम केले होते. फरेबमधील त्याचं गाणं 'तेरी आंखें झुकी झुकी' विशेष लोकप्रिय झालं होतं.

First published: November 4, 2020, 12:14 PM IST

ताज्या बातम्या