मुंबई, 17 जानेवारी : बहुचर्चित लेखक (Writer) आणि संगीतकार (Composer) जावेद अख्तर (Javed Akhtar) आज 77 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 17 जानेवारी 1945 मध्ये ग्वालियर येथे जावेद अख्तर यांचा जन्म झाला. वाढदिवसाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, 'जर तुमचा जन्म एखाद्या चांगल्या कुटुंबात झाला असेल, तर तेथे पालक नक्कीच तुमचा वाढदिवस साजरा (Birthday Celebration) करतात. वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद किंवा कुतुहूल लहान पणातच असतो. पण माझा वाढदिवस (Birthday) लहानपणी कधीही साजरा झालेला नाही. जेव्हा लोक मला केक कापायला (Cake Cutting) सांगतात तेव्हा मला ते खूप विचित्र वाटते, कारण मी केक कापण्या एव्हडा लहान नाही.' असं ते म्हणाले.
जावेद अख्तर सांगतात, 'आता त्यांच्यासाठी वाढदिवसाची व्याख्या खूप वेगळी आहे. वाढदिवस ही एक प्रथा असून तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांकडून खूप खूप प्रेम मिळणं म्हणजेच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा होणं आहे. आज माझ्या आयुष्यात माझी बायको शबाना आणि माझे मुलं माझ्या बरोबर असणं हेच माझं खरं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे.' आज मी कुठल्याही प्रकारची पार्टी (Party) किंवा सेलिब्रेशन करणार नसल्याचं जावेद अख्तरनी सांगितलं आहे.
सध्या अख्तर त्यांची पत्नी शबाना आझमी यांच्यासोबत (Shabana Azami) इंग्लंड (England) मध्ये आहेत. एका शूटिंगच्या संदर्भात शबाना सध्या इंग्लंडमध्ये आल्या आहेत. अख्तर सांगतात की, माझ्या 77 वर्षात मी जे अनुभवलं नाही ते मी गेल्या वर्षात 2020 मध्ये अनुभवलं. लॉकडाऊन दरम्यान सलग 3 महिने कुटूंब बरोबर वेळ घालवणं हे आयुष्यात पहिल्यांदाच शक्य झालं. 3 महिने मी माझ्या कुटूंबाबरोबर खंडाळ्यातील घरी होतो. आम्ही सोबत बरेच चित्रपट पाहिले, वाचन आणि आत्मनिरीक्षण केलं. आम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवायला मिळाला.