जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री जिने सख्ख्या भावासोबत केलाय रोमान्स, सीनने उडालेली खळबळ, कोण होती ती नायिका?

बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री जिने सख्ख्या भावासोबत केलाय रोमान्स, सीनने उडालेली खळबळ, कोण होती ती नायिका?

बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री जिने सख्ख्या भावासोबत केलाय रोमान्स

बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री जिने सख्ख्या भावासोबत केलाय रोमान्स

Bollywood Gossips: हिंदी सिनेसृष्टीत अशा काही बोलक्या डोळ्यांच्या अभिनेत्री आहेत. ज्यांना अभिनयासाठी डायलॉगचीसुद्धा गरज नव्हती.त्या आपल्या डोळ्यांनी सर्वकाही व्यक्त करायच्या.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 एप्रिल- हिंदी सिनेसृष्टीत अशा काही बोलक्या डोळ्यांच्या अभिनेत्री आहेत. ज्यांना अभिनयासाठी डायलॉगचीसुद्धा गरज नव्हती.त्या आपल्या डोळ्यांनी सर्वकाही व्यक्त करायच्या. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीनू मुमताज होय. या अभिनेत्रीने एक स्टेज डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आणि काही काळातच त्या बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर बनल्या होत्या. या अभिनेत्रीचं जितकं कौतुक झालं, तितकीच तिच्यावर टीकासुद्धा झाली होती. यामागे कारणही फारच विचित्र होतं. पाहूया नेमकं काय घडलेलं. मीनू मुमताज या दिग्गज अभिनेता-कॉमेडियन मेहमूद यांच्या सख्ख्या बहीण होत्या. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांचं नाव बदलून त्यांना नवं नाव सुचवलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गरिबीच्या दिवसांत त्या आपला मोठा भाऊ मेहमूद यांच्यासोबत आपल्या इतर 8 लहान भावंडांचा सांभाळ करत असत.

News18लोकमत
News18लोकमत

महत्वाचं मीनू मुमताज या हिंदी चित्रपटांमधील एकमेव अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी पडद्यावर आपल्या भावासोबतच रोमान्स केला होता. त्यांच्या या चित्रपटामुळे खळबळ माजली होती. इतकंच नव्हे तर त्यांच्यावर प्रचंड टीकासुद्धा झाली होती. (हे वाचा: Arshad Warsi B’day: बालपणातच आईवडिलांना गमावलं, घरोघरी जाऊन विकल्या त्या वस्तू; भयानक होतं ‘मुन्नाभाई’ फेम सर्किटचं आयुष्य ) मीनू मुमताज या आपल्या अभिनयापेक्षा जास्त आपल्या डान्ससाठी ओळखल्या जायच्या. त्यांना हा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला होता. मेहमूद आणि मीनू यांचे वडीलदेखील एक प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेते होते. त्यांचं नाव मुमताज अली असं होतं. मीनू आणि मुमताज यांना तब्बल आठ भावंडे होते. त्यांच्यामध्ये मेहमूद अली हे सर्वात मोठे होते. मीनू लहान असताना तिनेआपल्या डान्सर वडिलांसोबत वेगवेगळ्या शहरात लाइव्ह स्टेज शो करायला सुरुवात केली होती. आणि तेव्हापासूनच तिला डान्सची गोडी लागली होती. पण हळुहळू त्यांच्या वडिलांना दारुचं व्यसन जडलं.आणि त्यामुळे त्यांच्या घरचं वातावरण पूर्णपणे बिघडून गेलं होतं. परिस्थिती अशी झाली होती की, त्यांचे वडील दारु पिण्याशिवाय दुसरं काहीच करत नव्हते. अशात घरची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली होती. घरातील लहान मुलांना उपाशी झोपावं लागत होतं. अशा परिस्थितीत मीनू मुमताजने विचार केला की, जर आपण स्टेज परफॉर्मन्ससोबतच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली तर आपल्या घरची परिस्थिती थोडीफार सुधारु शकेल.

News18

मीनूला लहानपणापासूनच कलेची आवड होती. थोडाफार प्रयत्न केल्यानंतर अभिनेत्री देविका राणी यांनी मीनूला हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक दिला. त्यांनी मीनूला बॉम्बे टॉकीजमध्ये टेल डान्सर म्हणून कामावर घेतले. मीनूने तिच्या करिअरची सुरुवात 1955 मध्ये आलेल्या ‘घर घर में दिवाली’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात त्यांनी गावात राहणाऱ्या एका नर्तिकेची भूमिका साकारली होती. यानंतर ती ‘सखी हातिम’मध्ये दिसली, पण त्यांना खरी ओळख 1956 मध्ये आलेल्या गुरु दत्त यांच्या ‘सीआयडी’ चित्रपटातून मिळाली होती.

News18लोकमत
News18लोकमत

मीनू मुमताज यांचं सिने करिअर चांगलं सुरु होतं. अशातच त्यांना ‘हावडा ब्रिज’ चित्रपटाची ऑफर मिळाली होती. 1958 साली आलेल्या या चित्रपटाने संपूर्ण देशात खळबळ माजवली होती. या चित्रपटात मीनू यांनी आपला सख्खा भाऊ मेहमूदसोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला होता. त्या काळात भाऊ आणि बहिणीला ऑनस्क्रीन रोमान्स करताना पाहून लोकांनी संताप व्यक्त केला होता. हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात