Elec-widget

तन्मय भट्ट-गुरसिमर खम्बा 'एआयबी'तून पडले बाहेर !

तन्मय भट्ट-गुरसिमर खम्बा 'एआयबी'तून पडले बाहेर !

  • Share this:

मुंबई, 8 आॅक्टोबर : एआयबी या युट्यूब चॅनलचा सर्वात लोकप्रिय चेहरा असलेला तन्मय भट्टने आता एआयबीसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यासोबत गुरसिमर खम्बानेही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. #Metoo मोहिम आणि सोशल मीडियावर सतत एआयबी ट्रोल होत आहे त्यामुळे तन्मयने बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

AIB ने एक पत्रक प्रसिद्ध केलंय. या पत्रकात तन्मयने या पुढे AIB च्या कामात सहभागी होणार नाही असं स्पष्ट केलंय.

AIB चा सदस्य उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला. त्यानंतर AIBने निर्णय घेतला. उत्सववर एका महिला सहकाऱ्याने गंभीर आरोप केला होता. याबद्दल तन्मयला माहिती होती. पण यावर AIBने कोणतीही कारवाई केली नाही. तन्मयने याबद्दल माफी मागितलीये.

Loading...

तन्मयने याआधीही अनेक वाद ओढावून घेतले होते.तन्मय भट्ट याने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी केली होती. त्याच्या या पोस्टवर सोशल मीडियावर अनेकजण संताप व्यक्त केला होता.

या व्हिडिओमध्ये विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर असल्याच्या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडत सचिन आणि लता मंगेशकर यांच्या दरम्यानच्या काल्पनिक संवादातून आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आली होती.

एवढंच नाहीतर एआयबीतर्फे वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल ऑडिटोरियममध्ये 20 डिसेंबर २०१४ ला 'एआयबी नॉकआऊट - रोस्ट ऑफ अर्जुन कपूर ऍण्ड रणवीर सिंग' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात करण जोहर, अर्जुन-रणवीर यांच्याबरोबरच दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट हे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या शोमध्ये अश्लील शब्दांचा भडीमार करण्यात आला होता.

या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रारी करण्यात आल्यात आणि राज्य सरकारनेही कार्यक्रमाच्या चौकशीचे आदेश दिले होते.  या शोविरोधात 14 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. तसंच मनसेनंही  AIB विरोधात आक्रमक भूमिका तन्मय आणि त्याच्या टीमला  खळ्ळ-खट्याक देण्याचा इशारा दिला होता.

--------------------------------------

VIDEO: आणखी एक थक्क करणारा रेल्वे स्टंट आला समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 07:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...