आज सकाळी ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं आहे. तसेच संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल जाणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यांच्या घरी पोहचत आहेत.
अभिनेता शाहरुख खानला दिलीपजी आपला मुलगा समजत होते. दिलीपजी गेल्याची माहिती समजताच शाहरुख त्यांच्या घरी पोहोचला आहे.
दिलीप कुमार यांना पहिल्यांदा 'दाग' या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचं फिल्मफेयर पुरस्कार देण्यात आलं होतं.