बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आयुष्यात प्रेम हे एकदाचं होतं. मात्र आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं आहेत ज्यांचं पहिलं प्रेम अपयशी ठरलं आहे. मात्र यांच्या आयुष्यात नव्याने प्रेमाचा बहर सुद्धा आला आणि तो यशस्वी ठरला. आज आपण बॉलीवूड मधील अशा असेचं काही कलाकार पाहणार आहोत.
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खाननं अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्नं केलं होतं. या जोडप्याला 2 सारा आणि इब्राहीम अशी दोन आपत्येसुद्धा होती. मात्र नंतर हे दोघे विभक्त झाले. त्यांनतर सैफच्या आयुष्यात करीनाचं आगमन झालं. या दोघांनी लग्नंसुद्धा केलं आणि आता या दोघांना 2 मुलं आहेत. आणि हे दोघे चांगल्या प्रकारे आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहेत.
अभिनेत्री दिया मिर्जानं सुद्धा नुकताचं दुसरं लग्नं केलं आहे. याआधी तिनं साहिल सांघासोबत लग्नं केलं होतं. मात्र लग्नाच्या 5 वर्षानंतर हे दोघे विभक्त झाले. आता दियाने उद्योजक वैभव रेखीसोबत विवाह केला आहे. आणि ती गरोदरसुद्धा आहे.
बॉलीवूड परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खानसुद्धा पहिल्यांदा रीना दत्ताच्या प्रेमात पडला होता. या दोघांनी लग्नंही केलं होतं. मात्र लग्नाच्या बऱ्याच वर्षांनतर हे दोघे विभक्त झाले. नंतर आमिर किरण रावच्या प्रेमात पडला आता हे दोघे सुखी वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री कल्की सुद्धा दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात होती. या दोघांनी लग्नंसुद्धा केलं होतं. मात्र नंतर तेसुद्धा विभक्त झाले. त्यांनतर कल्की इस्राइली संगीत शिक्षकाच्या प्रेमात पडली. आणि या दोघांना आता 1 मुलगी सुद्धा आहे.
अभिनेता फरहान अख्तरनं आधुना भाभानी हिच्यासोबत विवाह केला होता. या दोघांना 2 आपत्येसुद्धा आहेत. 16 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर हे दोघे दूर झाले. आता फरहान शिबानी दांडेकरच्या प्रेमात असलेला दिसून येतो. या दोघांना सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना बघण्यात येतं.
मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेत्री मलाइका अरोरानं अभिनेता अरबाज खानसोबत लग्नं केलं होतं. 19 वर्षांच्या सुखी संसारानंतर ह्या दोघांच्यात काहीतरी बिनसलं आणि या दोघांनी घटस्फोट सुद्धा घेतला आहे. आत्ता मलाइका आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या अर्जुन कपूरच्या प्रेमात आहे.