चित्रपटसृष्टीत कलाकार जितके प्रसिद्ध असतात तितकीच त्यांनी मुलं-मुलीसुद्धा असतात. एखाद्या कलाकाराप्रमाणे त्यांची चर्चा होतं असते. यामध्ये बॉलीवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानची मुलगी तर सर्वात वर आहे. सुहाना खान सतत आपल्या हॉट अंदाजाने सोशल मिडियावर चर्चेत असते.
सुहाना खान सतत आपल्या मैत्रीणींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. सुहानाच्या मैत्रिणीसुद्धा तितक्याच हॉट आणि सुंदर आहेत.
सुहानाला मध्यंतरी तिच्या सावळ्या रंगावरून सोशल मिडियावर हिणविण्यात देखील आलं होतं. मात्र सुहानानं मोठ्या धाडसानं या ट्रोलर्सचा सामना करत त्यांचे स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
सुहाना सतत आपल्या मैत्रीणींसोबत मौजमजा करताना दिसून येते. तिचा स्टाईल आणि लुक एखाद्या चित्रपट अभिनेत्रींसारखा असतो. तिच्या स्टाईलचं नेहमीच चाहत्यांकडून कौतुकदेखील होतं असतं.
सुहाना सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. तिच्या प्रत्येक पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट सुद्धा केलं जातं. सध्या सुहानाचे इन्स्टाग्रामवर 1.6 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
सुहाना खान सध्या चित्रपट सृष्टीपासून दूर असली. तरीसुद्धा ती एखाद्या अभिनेत्री इतकीच प्रसिद्ध आहे. आणि अनेक लोक तिचे आत्तापासूनच चाहते आहेत.