बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या कपलपैकी एक आहेत. 17 जानेवारी 2001 ला अक्षय आणि ट्विंकल विवाह बंधनात अडकले होते. आज या दोघांच्या लग्नाला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना आरव आणि नितारा अशी दोन मुलं आहेत. (Photo credit: instagram/@twinklerkhanna)
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना पहिल्यांदा एका मॅगझिन (Magzine) फोटोशूट (Photoshoot) दरम्यान भेटले होते आणि अगदी पहिल्याच भेटीत अक्षय ट्विंकलच्या प्रेमात पडला. (Photo credit: instagram/@twinklerkhanna)
यानंतर अक्षय आणि ट्विंकल एकमेकांना डेट करायला लागले, पण पूर्वी दोघेही एकमेकांबद्दल फार सिरिअस नव्हते. (Photo credit: instagram/@twinklerkhanna)
इंटरनॅशनल खिलाडी (International Khiladi) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंतर ट्विंकल खन्नाने अक्षय बद्दल तिची आई डिम्पल कपाडिया (Dimple Kapadia) यांना सांगितलं. (Photo credit: instagram/@twinklerkhanna)
पण, पूर्वी डिंपल कपाडिया यांना अक्षय 'गे' असल्याची शंका होती. कालांतराने हा गोंधळ मिटला आणि अक्षय-ट्विंकल विवाह बंधनात अडकले. (Photo credit: instagram/@twinklerkhanna)
विशेष बाब म्हणजे ट्विंकलने अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी त्याच्या मेडिकल टेस्ट करवून घेतल्या होत्या. (Photo credit: instagram/@twinklerkhanna)
अक्षय कुमारला त्या टेस्टबाबत काहीही कळू न देता, ट्विंकलने नातेवाईकांच्या मदतीने वैद्यकीय टेस्ट करवून घेतल्या होत्या. (Photo credit: instagram/@twinklerkhanna)
तसंच लग्नापूर्वी ट्विंकलने अक्षयला त्याच्या मेडिकल हेल्थबाबत बरेच प्रश्न विचारले होते. (Photo credit: instagram/@twinklerkhanna)