बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. माधुरी आजही आपल्या स्माईल आणि लुकने सर्वांनाचं क्लीन बोल्ड करते.
माधुरीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर असे फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अप्रतिम दिसत आहे.
या फोटोंमध्ये माधुरी एकदम मराठी मुलगी बनली आहे. अर्थातचं ती हिंदी चित्रपटांत झळकत असली, तरीसुद्धा ती महाराष्ट्रीयन आहे.
माधुरीने फिकट हिरव्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे. तसेच नाकात नथसुद्धा घातली आहे. कपाळावर चंद्रकोरसुद्धा आहे. या वेषामध्ये ती अगदी अप्सरा भासत आहे.
माधुरी सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असते. ती सतत आपले फोटो आणि डान्स व्हिडीओ शेयर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असते.