‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या आयकॉनिक चित्रपटातून ‘चुटकी’ म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूजा रुपारेल सध्या काय करते असा अनेकांना प्रश्न आहे. पूजाने DDLJ मध्ये काजोलच्या छोट्या बहिणीची म्हणजेच चुटकीची व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र सध्या चित्रपट सृष्टीपासून लांब असलेली पूजा आज 40 वर्षांची आहे. चित्रपटांत नसली तरी पूजा अनेक कामात व्यग्र आहे. सध्या पूजा स्क्रिप्ट रायटर, स्टँड अप कॉमेडियन, सिंगर म्हणून आपलं काम उत्तम पार पाडत आहे. स्टँड अप कॉमेडियन म्हणून ती अनेक शो करत असते. ती सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असते. पूजा चित्रपटांपासून दूर असली तरी ती बॉलिवूड कलाकारंच्या संपर्कात असते. पूजाने ‘किंग अंकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. पूजा सध्या आपलं आनंदी आयुष्य जगत आहे. पूजा आपल्या खाजगी आयुष्यात व्यग्र आहे.