दिवाळी हा सण आपल्यासाठी फारच महत्वाचा सण समजला जातो.दिवाळीमध्ये फराळ, प्रकाश यांसोबतच एक गोष्ट महत्वाची असते आणि खास करून महिलांसाठी ती म्हणजे लूक. या काळात महिलांना सर्वात जास्त सुंदर दिसायचं असतं. त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही खास लुक्स घेऊन आलो आहोत.करिना कपूर ते ऐश्वर्या रॉय पर्यंत तुमच्या आवडत्या अभिनेत्रीचा लूक तुम्ही कॅरी करू शकता.
अभिनेत्री करीना कपूरने यामध्ये लींबू कलरचा शरारा घातला आहे. सोबतच हेवी नेकलेसने आणि पोनीने आपला लूक कम्प्लिट केला आहे. त्यामुळे तुम्ही हा लूक आरामात कॅरी करू शकता.
तुम्हाला अगदीच हेवी लूक आवडत असेल तर तुम्ही क्रिती सेननसारखा एम्ब्रॉयडरी वर्कचा लेहेंगा परिधान करू शकता.
तुम्हाला पार्टी विअर लूक द्यायचा असेल तर तुम्ही आलिया भट्टसारखा ब्लॅक कलरचा प्लॅन ड्रेस विथ हेवी दुपट्टा लूक कॅरी करू शकता. सोबतच हल्क्याशा आय लायनर आणि लिपस्टिकने आपला लूक कम्प्लिट करू शकता.
या फेस्टिव्ह सीजनमध्ये दीपिका पादुकोणसारखा स्टायलिश सारी लूकही फारच खुलून दिसेल यात काही शंका नाही.
अभिनेत्री ऐश्वर्या रॉयसुद्धा नेहमीच ब्युटी गोल्स देत असते. या अभिनेत्रीने कॅरी केलेलं ट्रॅडिशनल रेड सारी लूकसुद्धा तुम्हाला खुलून दिसेल. हे काही लुक्स तुमच्या आनंदात आणि दिवाळीत चार चांद लावणार हे नक्की.