
बॉलीवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री यामी गौतमने काहीही परिधान केले तरी ती नेहमीच आकर्षक दिसते. भारतीय पारंपारिक ड्रेस असो किंवा वेस्टर्न ड्रेस यामी सगळ्यांमध्येच शोभून दिसते. अभिनेत्रीचा ड्रेसिंग सेन्स अप्रतिम आहे. अनेकदा ती तिचे नवीन कलेक्शन तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. कोणत्या प्रसंगी काय घालावे हे तिला चांगले माहीत आहे. यामीने तिच्या पहिल्या करवा चौथला बनारसी साडी नेसली होती आणि तिचे मंगळसूत्र खूप खास होते. पाहा त्यांची काही खास छायाचित्रे.

याच वर्षी लग्न झालेल्या यामी गौतमचा हा पहिला करवा चौथ होता. म्हणूनच या खास प्रसंगी तिने पारंपरिक बनारसी साडी नेसली होती. तसेच लाल लिपस्टिक आणि बिंदीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. पण सगळ्यांच्या नजरा तिच्या मंगळसूत्रावर खिळल्या होत्या.

हा माझा पहिला करवा चौथ आहे आणि तो आणखी खास झाला आहे कारण मी बल्गारी मंगळसूत्र घातले आहे." यमीने घातलेल्या या मंळसूत्राची किंमत 3,49,000 रुपये आहे.

यामी गौतमला इंडियन लूक आवडतो. काही दिवसांपूर्वीही तिने सणासुदीच्या सुरुवातीला सलवार कमीज परिधान केला होता. पर्पल कलरच्या कुर्त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिने कानातले तेच घातले होते जे तिने करवा चौथच्या दिवशी घातले होते.

यामी गौतम 'भूत पुलिस' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बटन डाउन स्कर्टमध्ये दिसली होती. यासोबतच तिने क्रॉप टॉप घातला होता.




