मुंबई, 31मार्च: आपल्या खणखणीत अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडणारी अभिनेत्री (actress) म्हणजे विद्या बालन (Vidya Balan) होय. विद्या आपल्या अभिनयातूनही आपलं सौंदर्य जपताना दिसते. विद्या बऱ्याच ठिकाणी फक्त पारंपरिक साडीमध्ये (saree) दिसून येते. मात्र यासाठी तिला ट्रोल करणाऱ्या लोकांच्या तोंडावर तिनं एका व्हिडीओच्या (video) माध्यमातून चांगलाच चपराक दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल (viral) होतं आहे. विद्या ही एक अशी हरहुन्नरी अभिनेत्री आहे, जी स्वतःच्या बळावर प्रेक्षकांना खेचून आणते. तिला आपले चित्रपट यशस्वी करण्यासाठी कोणत्याही मोठ्या नायकाची गरज नसते. विद्या नेहमीच निवडक चित्रपटांमध्ये काम करताना दिसून येते. तिचे चित्रपट हे नेहमीच नायिका केंद्रित असतात. विद्याचा मोठा चाहतावर्ग आहे. विद्या एखाद्या अभिनेत्याप्रमाणे आपला चित्रपट चालविते. अभिनय अस्सल असेल तर प्रेक्षक दाद देणारचं. हे म्हणणं विद्याला तंतोतंत लागू पडतं. विद्याने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या चित्रपटांत तोचतोच पणा नाही आढळत.
विद्या ही साडीची खूप मोठी चाहती आहे. ती कायम सर्वत्र साडीमध्येचं दिसून येते. विद्याला या पारंपरिक अंदाजात पाहून, बरेच लोक तिची खिल्ली सुद्धा उडवतात. विद्या पाश्चात्य कपड्यांमध्ये दिसणारचं नाही असं अनेकांना वाटतं. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, विद्यानं त्या सर्वांचंचं तोंड बंद केलं आहे. या व्हिडीओ मध्ये विद्या आधी साडीमध्ये असते आणि नंतर एका चुटकित ती पाश्च्यात रुपात अवतरते. साडीमध्ये आणि नंतर हिरव्या रंगाच्या वेस्टर्न गाऊनमध्ये विद्या कमालीची सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर विद्यानं व्हिडीओच्या खाली एक कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे. त्यात ती म्हणते ज्यांना वाटतं की मी फक्त भारतीय वेशभूषा परिधान करते. त्यांनी फक्त एक चुटकी वाजवा. (**हे वाचा:** टीव्हीवरील संस्कारी सून हिना खानने बिकिनीमध्ये लावला ‘Hotness’ चा तडका… ) विद्या बालनला विविध चित्रपटांसाठी राष्ट्रीय, फिल्मफेअर तसेच अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2014 मध्ये विद्याला अभिनयसृष्टीत उत्तम कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ प्रधान करण्यात आला आहे. विद्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात’ हम पांच’ या विनोदी टीव्ही मालिकेक्द्वारे केली होती. त्यानंतर तिनं 2005मध्ये ‘परिणीता’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात विद्या सैफ अली खानसोबत झळकली होती. विद्याने हिंदी,मल्याळम, तमिळ आणि बंगाली अशा विविध भाषेत अभिनय केला आहे. काही दिवसांपूर्वी विद्या ‘शकुंतला’ या चित्रपटात झळकली होती. यातही ती चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आगामी काळात विद्या ‘शेरनी’ या चित्रपटात दिसून येणार आहे.