**मुंबई 14 नोव्हेंबर : ‘**बेफिक्रे’मध्ये रणवीर सिंगसोबत अभिनेत्री वाणी (Vaani Kapoor) कपूरची केमेस्ट्री चांगलीच जमली होती. त्यानंतर ती ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टाइगर श्रॉफ (Tiger Shroff) सोबत ‘वॉर’ (WAR)मध्ये झळकली होती. सध्या तिची चर्चा होतेय ती वेगळ्याच एका कारणामुळे. वाणी कपूरने एक खास बिकिनी टॉप घालून तो हॉट फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर असं काही झाली की या बोल्ड अभिनेत्रीलाच बोल्ड व्हावं लागलं.त्याचं असं झालं की वाणी कपूरने जो खास बिकिनी टॉप घातला होता त्यावर ‘राम’ आणि ‘कृष्ण’ अशी नावं लिहिली होती. तिच्या या हॉट लुकिंग टॉप वर ‘हरे राम हरे कृष्णा’ असं लिहिलं होतं. त्यामुळे लोक वाणीवर चांगलेच चिडले.
Wearing Lord Sri Raam's name on the uncultured dresscode doesn't give value to the actress Vani Kapoor @Vaaniofficial. This is hurting the sentiments of devotees of Lord Sri Raam. We uarge to removed such images from the site and value the devotees sentiments.#vaanikapoor https://t.co/v0jRJntB5w
— Pratibha Nayak (@prati_nayak) November 13, 2019
अशा टॉपवर देवांची नावं लिहिणं कितपत योग्य आहे असा सवाल लोकांनी तिला विचारलाय. त्यावरून सोशल मीडियावर तिला जाम ट्रोल केलं गेलंय.तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती सुंदर दिसत असली तरी तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. नेटकऱ्यांचा राग वाढल्याने वाणीही बचावात्मक मुद्रेत आली. आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लोकांनी केला. तर काही जणांनी वाणीच्या चित्रपटांवर बहिष्कारही घालण्याची मागणी केली. नेटकरी सातत्याने ट्रोल करत असल्याने शेवटी वाणीला आपले हे फोटो सोशल मीडियावरून काढावे लागले.
We would like to appeal @Vaaniofficial to remove said photo that insults religious sentiments of millions of Hindus. Vaani ji, you have removed it from your @instagram, but its still there on your @facebook page & Twitter DP.#VaaniKapoor https://t.co/OhKX5t81jk
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) November 13, 2019