बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने काही हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
वाणी कपूरने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. याच चित्रपटासाठी वाणीला 'बेस्ट डेब्यू' म्हणून फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.
वाणी ही मूळची दिल्लीची आहे. तिने अभिनय करण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये नोकरीसुद्धा केली असून तिने 'travelling and tourisem हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
वाणीने काही काळ मॉडेलिंगसुद्धा केलं आहे. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या वडिलांचा यासाठी विरोध होता.
वाणीने हिंदीसोबत तमिळ चित्रपटात देखील काम केलं आहे. 'आहा कल्याणम' हा तिचा तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदीतील 'बँड बाजा बारात' या चित्रपटाचा रिमेक आहे.
वाणी एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वॉर' चित्रपटात वाणीने अभिनेता हृतिक रोशनसोबत 'घुंघरू टूट गये' या गाण्यावर कमालीचं नृत्य केलं होतं.
वाणी कपूर अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम' या आागमी चित्रपटात झळकणार आहे. हा एक थ्रीलर चित्रपट आहे. रंजित एम तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.