जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / उर्वशी रौतेलाचा नवा ड्रेस पुन्हा चर्चेत, किंमत वाचून फुटेल घाम

उर्वशी रौतेलाचा नवा ड्रेस पुन्हा चर्चेत, किंमत वाचून फुटेल घाम

उर्वशी रौतेलाचा नवा ड्रेस पुन्हा चर्चेत, किंमत वाचून फुटेल घाम

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत आपल्या एक्स्पेन्सिव्ह ड्रेसमुळे चर्चेत असते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, 22 मार्च-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपल्या स्टायलिश लुकने (Stylish Look) नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. हटके स्टाइल ही तिची ओळख आहे. तिच्या वॉर्डरोबमध्ये आकर्षक डिझाइनर सूट-साड्या, ग्लॅमरस मिनी ड्रेस, घेरदार भलेमोठे गाउन्स, आणि शॉर्ट्सचं हटके कलेक्शन पाहायला मिळतं. कोणत्या इव्हेंटला कोणत्या प्रकारची स्टाइल कॅरी करावी, याची तिला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे तिची स्टाईल नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नुकतीच तिला टुरिझम क्षेत्रातील एका मोठ्या एक्स्पोसाठी (Expo) आमंत्रित करण्यात आलं होतं. या वेळी तिनं घातलेल्या निळ्या रंगाच्या चमकदार हाय स्लीट ड्रेसनं सगळ्यांच्याच नजरा खिळवून ठेवल्या. हा ग्लॅमरस ड्रेस लग्नाच्या कॉकटेल पार्टीमध्ये (Coktail Party) घालण्यासाठी अगदी उत्तम आउटफिट आहे. उर्वशी रौतेलाचा हा ड्रेस तब्बल 30 लाख रुपये किमतीचा असून, त्यात ती अत्यंत सुंदर दिसत होती. एक्सपो 2020 मध्ये टूर्स पॅव्हेलियन्सचे रॉयल आमंत्रण मिळालेल्या उर्वशीनं या कार्यक्रमासाठी हजेरी लावून काही वेळ तिथं घालवला. इंडिया एक्सपो 2020च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर करण्यात आले असून, त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

    जाहिरात

    प्रख्यात डिझायनर, एलिझाबेथ फ्रँची यांनी तयार केलेला हा गाऊन अतिशय सुंदर आहे. लांब बाही, वरच्या बाजूला कटआउट आणि बेअर बॅक असणाऱ्या या बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये उर्वशीचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. 1 लाख 94 हजार 197 रुपये 43 पैसे किमतीच्या या ड्रेसला शोभेल अशी ज्वेलरी उर्वशीने घातली होती. तिनं 15,089,21 रुपये किमतीचे ऱ्हाईन स्टोन या उंची रत्नांनी सजवलेला पॅडलॉक घातला होता. तसंच एलिझाबेथ फ्रँची यांनी तयार केलेलं 11,434,44 रुपये किमतीचं सोन्याचं ब्रेसलेट घातलं होतं. तसंच 27,240,86 रुपये किमतीच्या स्फटिकांसह टॉर्चऑन रिअल सोन्याचा हार घातला होता. अतिशय लाईट मेक अप केला होता. यात तिचे डोळे हायलाईट करण्यात आले होते. निळ्या शिमरसह न्यूड आयशॅडो आणि परफेक्ट ब्लशसह न्यूड लिपस्टिक लावल्यानं उर्वशीचे अतिशय सुंदर दिसणारे डोळे सगळ्यांना खिळवून ठेवत होते. तिचा हा लूक कॉकटेल पार्टी किंवा बॅचलर पार्टीसाठी अगदी उत्तम होता. (हे वाचा: PHOTO: माधुरी दीक्षितने खरेदी केलं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क ) उर्वशी याआधी मिस युनिव्हर्स पेजेंट 2021 मध्ये परीक्षक म्हणून होती. अरब सुपरस्टार मोहम्मद रमजान सोबतचे तिचं आंतरराष्ट्रीय गाणं ‘वर्सासे बेबी’ चांगलंच गाजलं आहे. लवकरच ती जिओ स्टुडिओच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’या वेब सीरिजमध्ये रणदीप हुडा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘थिरुत्तू पायले-2’ च्या हिंदी रिमेकसह ती थ्रिलर ‘ब्लॅक रोझ’मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. उर्वशी सर्वणाबरोबर ‘द लीजेंड’मधून तमीळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. जिओ स्टुडिओ आणि टी-सीरीजसोबत तीन चित्रपटांचा करारही उर्वशीनं केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात