मुंबई 18 मार्च: बॉलिवूड कलाकारांची प्रेमप्रकरणं जितकी गाजतात तितकीच त्यांची मैत्री देखील चाहत्यांसाठी चर्चेचा विषय़ ठरते. अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत असतात. इतकंच काय तर अनेक कलाकारांनी एकाच शाळेच शिक्षण देखील घेतलेलं असतं. ट्विंकल खन्ना आणि करण जोहर ही देखील अशाच लोकप्रिय सेलिब्रिटीं जोड्यांपैकी एक आहे. या दोघांमधील घट्ट मैत्री अनेकदा दिसून आली आहे. सध्या करण आणि ट्विंकलच्या मैत्रीची अशीच एक गोड आठवण सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
काही वर्षांपूर्वी करण जोहर अभिनेत्री आणि बालमैत्रीण ट्विंकल खन्नाच्या प्रेमात पडला होता. तो ट्विंकलला खूपच पसंत करत होता. त्यानं ट्विंकलजवळ आपलं प्रेम व्यक्त सुद्धा केलं होतं. असं स्वतः ट्विंकलनं सांगितलं आहे. 2015 मध्ये ट्विंकल खन्नानं आपलं एक पुस्तक प्रकाशित केलं होत. ‘मिसेज फानिबोन्स’ असं या पुस्तकाचं नाव होतं. यात तिनं आपल्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उलघडा केला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी एका मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या आणि करणच्या बाबतीत घडलेल्या या गोष्टी बिनधास्त अंदाजात मीडियासमोर मांडल्या होत्या.
View this post on Instagram
ट्विंकल आणि करण एका पहाडी शाळेत शिकायला होते. तिथून त्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्या प्रसंगाने करण इतकं भयभीत झाला होता की, त्यानंत्या शाळेतून आपलं नाव मागे घेण्यासाठी आई वडिलांना तगादा लावला होता.
ट्विंकल ही जेष्ठ अभिनेता आणि अभिनेत्री राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांची मुलगी आहे. त्याचबरोबर तिनं बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्नं केलं आहे. ट्विंकलनं ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या अभिनय कारकिर्दीत तिनं जब प्यार किसीसे होता है, जान, दिल तेरा दिवाना, इंटरनेशनल खिलाडी, मेला अशा अनेक चित्रपटांतून काम केलं आहे. त्याचबरोबर तिनं निर्माता म्हणूनही काम केलं आहे. तीस्मार खां, पटियाला हाउस, हॉलिडे अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे.
(हे वाचा: विरुष्काच्या दरवाजावर झळकलं वामिकाचं नाव; पाहा PHOTO )
करण जोहरबद्दल सांगायचं झालं तर, करण हा निर्माता, निर्देशक, होस्ट, लेखक अशा अनेक क्षेत्रात झळकला आहे. करणने आपल्या ‘धर्मा प्रोडक्शन’च्या छताखाली अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. कुछ कुछ होता है, कभी ख़ुशी कभी गम, माय नेम खान अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच निर्देशन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Twinkle khanna