अभिनेत्री तापसी पन्नूची बहीण शगुन पन्नूसुद्धा अलीकडे नेहमीच चर्चेत असते. शगुनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली नाही. मात्र तरीसुद्धा तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. शगुनचा फिटनेस एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देईल असाच आहे. शगुन आणि तापसीमध्ये खूपच चांगलं बॉन्डिंग आहे. नेहमीच या दोघी सोबत सैरसपाटा करताना दिसून येतात. शगुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना अपडेट्स देत असते, शगुन नेहमीच वेगवगेळ्या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेताना दिसून येते. मीडिया रिपोर्टनुसार शगुनला अजून तर बॉलिवूडमध्ये येण्याची कोणतीच इच्छा नाहीय. ती ग्लॅमर पासून लांब राहून आपली लाईफ एन्जॉय करत आहे.