मुंबई, 17 फेब्रुवारी: कर्नाटकातील (Karnataka Hijab Row) एका शैक्षणिक संस्थेतून सुरू झालेला हिजाब वाद (Hijab Row) अद्याप कमी होताना दिसत नाहीये. यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. नेत्यांसोबतच बॉलिवूड (Bollywood reactions on Hijab Row) सेलिब्रिटीही या विषयावर त्यांचे मत मांडतायत. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हिजाब वापरण्याला (Swara Bhaskar supporting the hijab) पाठिंबा दिला होता. या वादाचा संबंध तिने महाभारतातील द्रौपदीच्या वस्त्रहरणशी जोडला होता. त्यानंतर सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी तिच्यावर जोरदार टीका केली होती. नुकताच एका युजरने स्वराचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर स्वरा चांगलीच भडकली असून तिने त्या फोटोवर प्रतिक्रिया देताना संबंधित युजरला चांगलेच सुनावले आहे. सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, जिथे लोक त्यांच्या भावना, मतं उघडपणे व्यक्त करतात. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही हिजाब वादावर तिचं मत सोशल मीडियावर मांडलं होतं. मात्र, तिने मांडलेलं मत काही लोकांना आवडलं नाही, आणि त्यांनी स्वराला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने तर नुकताच स्वराचा शॉर्ट ड्रेसमधील फोटो पोस्ट केला असून या फोटोसोबत ‘मित्रांनो ही स्वरा भास्कर आहे, जी हिजाबची वकिली करत आहे,’ असे कॅप्शन लिहिले आहे. या युजरने हे ट्वीट आता डिलीट केले आहे.
स्वराने दिलं उत्तर स्वतःचा शॉर्ट ड्रेसमध्ये असणारा फोटो व त्यासोबतचे कॅप्शन पाहून स्वरा चांगलीच भडकली, तिने ट्वीट करून त्यावर उत्तर दिलंय. ती म्हणते, ‘हो, मीच आहे. फोटोत मी एकदम फटाका दिसत आहे. थँक्यू. माझा हा फोटो शेअर केल्याबद्दल आणि मी किती सुंदर आहे, हे जगाला सांगितल्याबद्दल आभारी आहे. महिलांनी त्यांच्या आवडीचे कपडे घालावेत, यासाठी मी वकिली करतेय. तुम्हाला माहितीच असेल आवड काय असते. काही नाही राहू द्या. तुम्ही फक्त इतरांचा अपमान करा, पण त्यातही अपयशी ठरत आहात.’
Yeah, it’s me.. looking bomb 🔥 Thank u! 🤗🙏🏽
— Swara Bhasker (@ReallySwara) February 16, 2022
Thanks for sharing this pic of mine & reminding the world that I’m also a hottie ! 🤓
I advocate Women’s right to choose their clothing.. you know ‘choice’ -koi nahi aap rehney doh.. aap karo slutshame kisi aur ko- usmey bhi fail 😆 https://t.co/OvvHN9VXnn
स्वरा भास्कर म्हणून झाली होती ट्रोल स्वरा भास्करने यापूर्वी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये, तिने हिजाब वादाची तुलना द्वापर युगातील ‘द्रौपदी वस्त्रहरण’सोबत केली होती. तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, ‘महाभारतात द्रौपदीचं वस्त्रहरण बळजबरीने काढण्यात आलं आणि सभेत बसलेले जबाबदार, शक्तिशाली, कायदा करणारे बघतच राहिले…आज फक्त त्याची आठवण झाली.’ तर, स्वरापूर्वी अभिनेत्री सोनम कपूरलाही तिच्या प्रतिक्रियेवरुन लोकांनी ट्रोल केले होते, ती म्हणाली होती की, ‘जेव्हा पगडी घालायला हरकत नाही, मग हिजाबला का?’ हे वाचा- फरहान-शिबानी मराठमोळ्या पद्धतीने करणार लग्न, याठिकाणी पार पडणार विवाहसोहळा कर्नाटक येथून सुरू झालेला हिजाब वाद हा अद्यापही मिटताना दिसत नाही. यावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. परंतु कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच यावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हिजाब वादावरून प्रतिक्रिया उमटत आहेत